You get good marks even without class | विना क्लासचेही चांगले मार्क मिळतात | सोलापूरची अदिती लिगाडे इतरांसाठी ठरली आदर्श
Aditi Ligade from Solapur is a role model for others | एसएससी मार्च २०२२ परिक्षेत मिळवले ८९.६० टक्के

सोलापूर : विना क्लासचेही चांगले मार्क मिळवता येतात. याचे उदाहरण सोलापूरच्या आदिती विजयकुमार लिगाडे हिच्या (Aditi Ligade from Solapur is a role model for others) रूपात पाहावयास मिळाले आहे. १ ते १० इयत्तेपर्यंत क्लासला न जाता तिने ८९.६० टक्के (Achieved 89.60 percent in SSC March 2022 examination) गुण मिळवले आहेत.

शालेय शिक्षणाचा एकूणच प्रवास
लिगाडे कुटुंबिय मूळचे सोलापूरचे आहेत. या कुटुंबियाचे प्रमुख विजयकुमार लिगाडे हे खासजी क्षेत्रात कार्यरत असून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सर्वसामान्य जीवन जगणाºया लिगाडे दाम्पत्याने मुलगी आदिती व मुलगा अर्थव या दोघांनाही उत्तम संस्कार देत त्यांना शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे वेळोवेळी पटवून दिले. त्यामुळेच १ ते ४ पर्यंतचे शिक्षण सांगोला ताुलक्यातील शिरभावी गावात असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळेत पूर्ण करून आदितीने पाचवीला स्वामी विवेकानंद प्रशाला-जुळे, सोलापूर या शाळेत प्रवेश घेतला. नववीपर्यंत चांगल्या गुणांनी पास झालेल्या आदितीने दहावीत ८९.६० टक्के गुण मिळवले. शाळेतील शिक्षकांनी शिकवलेल्या धड्यांची आदिती घरी उजळणी करायची. शिक्षक वर्गात शिकवताना ती लक्षपूर्वक अभ्यास ग्रहण करायची. शाळेतून घरी आल्याने पुन्हा उजळणी करून संबंधित विषयांचा अभ्यास पक्का करायची. अशा प्रकारे आदितीने विना क्लास दहावी इयत्तेत उत्तीर्ण होऊ न इतरांची आदर्श ठरली आहे.