World Blood Donation Day | Blood donor in khaki | जागतिक रक्तदान दिन | खाकीतला रक्तदाता | रक्तदानाच्या संकल्पातून पोलीस पिता-पुत्रीने घडवले माणुसकीचे दर्शन
पित्याचे ५३ वेळा तर मुलीचे चौथ्यांदा रक्तदान



Blood Donation | पित्याच्या मार्गावर मुलीची वाटचाल
पोलीस म्हटले तर कामाचे अनिश्िचत तास असतात. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना कायम सतर्क राहावे लागते. असे असताना कर्तव्यासह माणुसकी जपण्यासाठी नागपाडा दहशतवादविरोधी पथकात कर्तव्याला असलेले पोलीस हवालदार बलराज गणपत साळोखे यांनी पुढाकार घेतला. बलराज यांनी रक्तदान करण्याचा संकल्प सुरू केला. आजवर त्यांनी केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे जीवदान मिळाले आहे. पोलीस पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगी केतकी हीदेखाील रक्तदान करत आहे. नियमीत रक्तदान करत असल्याने जे जे रुग्णालयाच्या रक्तपेढीचे समाजसेवा अधीक्षक ज्ञानेश्वर कदम, डॉ. अमित सूर्यवंशी यांनी बलराज व त्यांची मुलगी केतकी हिचे कौतुक केले. या रक्तदाना प्रसंगी डॉक्टर आगळे मॅडम, डॉक्टर संजय बीजवे, डॉक्टर भरत घोडके, जे जे रुग्णालयाच्या रक्तपढेतील समाजसेवा अधीक्षक डी. व्ही. कदम आदी उपस्थित होते.

कोविड संकट काळात ७ वेळा रक्तदान करणारा खाकीतला रक्तदाता!
गेल्या २ वर्षांपूर्वी जगात कोविड-19 चे संकट आले. या संकट काळात राज्यात रक्ताचा साठा अपुरा पडू लागला. कोरोना संकटात रक्ताची कमतरता भासू लागली. या दुहेरी संकटांना सामोरे जात असताना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकांना रक्तदान करण्याचे जाहीरपणे आवाहन केले. मात्र नित्याने रक्तदान करणारे बलराज साळोखे यांनी कोरोना संकटातही नियमानुसार ७ वेळा रक्तदान केले असून, एकदाही रक्तदान केल्यानंतर सुट्टी न घेता कर्तव्यावर हजर राहिले आहेत. त्यामुळे साळोखे हे वेळात वेळ काढून जे जे रुग्णालयातील रक्तपेढीत रक्तदान करतात, हे त्यांच्या सहका-यांनाही माहीत पडत नाही.
Very Nice Work Done By You 👍
Thanks