क्राईम न्यूजमहाराष्ट्र

Waliv Police for solving Murder of a woman | महिलेचा खून करून मृतदेह फेकला कळंब खाडीत

गुन्ह्यांची उकल करणा-या वालीव पोलिसांचे कौतुक

वसई : २६ जुलै २०२१ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वे नं १५७ भुईगाव कळंब खाडीकिनारी एक रेगजीन बॅग तरंगत होती. अर्धवट उघड्या बॅगेतून दुर्गंधी येत होती. या बॅगेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांचे पथक तात्काळ खाडीकिनारी दाखल झाले. सदर बॅग बाहेर काढली असता त्यात अंदाजे २० वर्षांहून अधिक वयोगटातील तरुणीचा शिर नसलेला मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहावर उजव्या हातावर लाल काळ्या रंगाचे मारहाण केल्याचे व्रण होते. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात २६ जुलै २०२१ रोजी भादंवि कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल केला. मृत तरुणीचे शिर धडा वेगळे असल्याने तिची ओळख पटवण्यासाठी परिमंडळ २ चे उपायुक्त संजयकुमार पाटील, वसई विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली. या पथकाने मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, पालघर जिल्ह्यातील व राज्यातील मिसिंग महिलांची माहिती प्राप्त करून अनोळखी मयत महिलेशी, तिने परिधान केलेल्या कपड्यांचे साधर्म्य तपासण्यात आले.

तपासादरम्यान २९ आॅगस्ट २०२२ रोजी आचोळे पोलीस ठाण्यात कमरुनिसा मोहम्मद अली (निपानी रा. बेळगाव, कर्नाटक) यांनी गु. र. क्र. ११२/२०२२ नुसार तक्रार केली होती. त्यांची नात सानिया आसिफ शेख (वय २४, रा. नालासोपारा, पूर्व) ही १३ महिन्यांपासून बेपत्ता झाल्या प्रकरणी नोंद करण्यात आली होती. सदर मिसिंग दीर्घ कालावधीनंतर दाखल करण्यात आल्याने व तिचे वर्णन हे वसई पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यातील अनोळखी मयत महिलेच्या वर्णनाशी मिळतेजुळते असल्याने नमूद खबर देणारी महिला व मिसिंगचे नातेवाईक यांचेकडे चौकशी केली असता बेपत्ता महिला हिचे पती आसिफ हनिफ शेख , रा . नालासोपारा ( पुर्व ) यांनी ती बेपत्ता झालेबाबत कोठेही पोलीस ठाण्यात खबर दिली नसल्याचे व ते नमुद राहता पत्ता सोडून मुंब्रा येथे राहण्यास गेले असल्याचे समजले. हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने बेपत्ता महिलेचा पतीकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यानेच पत्नीचा खून केल्याचे निष्पन्न झाले. सदर बाब उघडकीस येताच पती आसिफ हनिफ शेख याला अटक करण्यात आली.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून यातील मयत महिलेची ओळख की अज्ञात आरोपीताचा शोध लागणे फार कठिण झालेले असतांना वसई पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अविरत परिश्रम घेवून तसेच इतर पोलीस स्टेशनला दाखल होणाºया सर्व मनुष्य मिसींग प्रकरणांवर लक्ष ठेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याने वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ऋषीकेष पवळ, पोलीस निरीक्षक (प्रशासन) अब्दुलहक देसाई, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि राम सुरवसे, सुनिल पवार , सागर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघमोडे, सपोउपनि जयंत पाटणकर, हवालदार सुनिल मलावकर, विनोद पाटील, पोना मिलिंद घरत, अंमलदार शरद पाटील, विनायक कचरे, सूर्यकांत मुंढे, भरत शेलार, बाळू गर्जे, नांदगांवकर, अमोल बडे या पोलीस पथकाचा पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये उत्कृष्ट उकल क्रमांक- १ म्हणून प्रशस्तीपत्र व बक्षिस देऊन सन्मानित केले.

⇓⇓⇓ ही बातमीही वाचा…⇓⇓⇓

लाखो रुपयांच्या मालासह ट्रेलर पळवणारी टोळी जेरबंद

⇓⇓⇓ ही बातमीही वाचा…⇓⇓⇓

गळा आवळून दुकानात केला खून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.