क्राईम न्यूजमहाराष्ट्र

Two bogus TCs from Nashik, Dhule arrested | नाशिक, धुळ्याच्या दोन बोगस टीसींना अटक

कल्याण लोहमार्ग पोलिसांची कारवाई

कल्याण : बनावट ओळखपत्रांच्या आधारे प्रवाशांचे तिकीट, पास चेक करणाºया दोन बोगस टीसींना अटक करण्यात आली. सदर कारवाई कल्याण लोहमार्ग पोलिसांनी केली. दोन्ही आरोपी नाशिक व धुळे येथील रहिवासी असून त्यांच्याकडून बोगस आयकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

कसारा स्थानकात
सुरू होती भामटेगिरी

मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ४ वरील कॅन्टीनसमारे दोन टीसी प्रवाशांचे तिकीट तपासत होते. त्यांच्या संशयास्पद हालचालींवर संशय आल्याने कल्याण लोहमार्ग पोलिसांनी त्यांची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील ओळखपत्रांची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे कर्मचारी असल्याचे भासवून फसवणूक केल्या प्रकरणी आरोपी संदीप पवार (वय 27, रा. महाळ्याचा पाडा, पो-सुकापुर, ता. साक्री, जि. धुळे), रोहीदास गायकवाड (वय 30, रा. मु. पो. उंबरपाडा, ता. सुरगाणा, जि. नाशिक) यांच्याविरुद्ध कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे (गुन्हा रजि.क्र.1317/2022) भादंवि कलम 170, 420, 34 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद देशमुख करत आहेत.

यांनी केली कारवाई

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे, पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर, अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि देशमुख, हवालदार कुटे, वानखेडे, पोना विशे, चव्हाण, अंमलदार शेळके, व्हरकट, शेटे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.