मेट्रो सिटी न्यूज

Truck, dumper stealing gang jailed | ट्रक, डंपर चोरणारी टोळी जेरबंद

मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये कारवाई, दाम्पत्यासह तिघांना अटक

मुंबई : मुंबईतील उपनरांमधील ट्रक, डंपर चोरणाºया टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. ही कौतुकास्पद कारवाई मुंबई पोलीस दलाच्या घाटकोपर पोलिसांनी केली. या कारवाईत तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यात एका दाम्पत्याचा समावेश आहे. या आरोपींच्या अटकेमुळे ३ गुन्ह्यांची उकल झाली असून गाड्याचे सुटे पार्ट्स, गॅस सिलिंडर, कटर, हातोडो व अन्य साहित्य जप्त केले आहे.

२४ डिसेंबर २०२२ रोजी घाटकोपर परिसरातून ५ लाख रुपयांचा ट्रक (एमए) चोरीला गेला. ५ लाख रुपयांचा ट्रकचोरीलाा गेल्या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरणचे पथक करू लागले. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना आरोपींची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक गुजरात राज्यात दाखल झाले. या गुन्ह्यातील आरोपी सुखदेवसिंग साजुसिंग सोहल (५३) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने इतर २ साथीदारांची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सुनीता सुखदेविसिंग साहेल (४३) व फिरोज शेख (४३, सर्व राहणारे गुजरात) यांना अटक केली.

मुख्य आरोपीविरुद्ध १० गुन्हे…..

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुखदेवसिंग सोहल या वाहने चोरण्यात सराईत असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये १० गुन्हे दाखल आहेत. मुंबईत रस्यावर उभे असलेल्या वाहनांची चोरी करून गुजरातमध्ये नेत असे. तेथे वाहनांचे पार्ट्स वेगवेगळे करून त्याची विक्री करत असे. अशा प्रकारे त्याने घाटकोपर, साकीनाका व एमआयडीसी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

यांनी केला तपास

या गुन्ह्याचा तपास बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्त सत्यनारयण चौधरी, पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, परिमंडळ ७ चे उपायुक्त पुरुषोत्तम कराड, घाटकोपर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद नेर्लेकर, वपोनि संजय डहाके, पोनि प्रमोद कोकाटे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि पद्माकर पाटील, ज्ञानेश्वर खरमाटे, फय्याज मुलाणी, हवालदार चव्हाण, पोना कोयंडे, देवार्डे, कंक, म्हस्के, अंमलदार नागरे, अहिरे, सुरवाडे, भोकरे, गव्हाणे, चव्हाण यांनी केला.

ही बातमी वाचा

पोलीस उपनिरीक्षक पिलाणी यांची कौतुकास्पद कामगिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.