Tribute to Hanumant Sathe | हनुमंत साठे यांना यवतमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली
विविध संघटनांच्या व्यक्तींनी अर्पण केली श्रद्धांजली

दौंड : हरिभाऊ बळी
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाचे नेते तथा आरपीआय मातंग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांच्या निधनाने बौद्ध व मातंग यांना जोडणारा दुवा हरपल्याची भावना शोकसभेत विविध वयांनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली.
दिवंगत नेते हनुमंत साठे यांच्या निधन झाल्याने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने व विविध संघटनेच्या वतीने यवत येथील काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी १७ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.या शोकसभेत विविध संघटनांच्या व्यक्तीनी आयोजित कार्यक्रमात स्वर्गीय नेते हनुमंत साठे यांना श्रध्दांजली अर्पण केली.यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर, उत्तम गायकवाड यांनी दिवंगत नेते हनुमंत साठेंच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. यावेळी अरविंद दोरगे, ग्रामविकास अधिकारी चखाले, विष्णू बोडके, गणेश गायकवाड, सोनू काळे, लालू जामले, बाबा पवार भरत भुजबळ, अनिल काका अवचट, संजय आडागळे, अल्ताफ शेख,बाळू मोरे, काळूराम शेंडगे,संदीप गायकवाड,जिजाऊ ब्रिगेड दौंड तालुका अध्यक्षा सारिका भुजबळ आदींसह विविध सामाजिक संघटनेचे अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.