theft of mobile | Selling mobiles in Nepal, UP, Kolkata | मुंबईत चोरलेल्या मोबाईलची नेपाळ, यूपी, कोलकातामध्ये विक्री
साडे सतरा लाखांचे मोबाईल जप्त; टोळीतील ७ जणांना अटक

मुंबई : मुंबई शहरात ठिकठिकाणी चोरलेल्या मोबाईलची नेपाळ, यूपी, कोलकातामध्ये विक्री करणाºया टोळीतील ७ जणांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मानखुर्द पोलिसांनी केली असून या कारवाईत १७ लाख ८५ हजारांचे ७८ मोबाईल फोन जप्त केले आहेत. या मोबाईलमध्ये २५ अॅपल फोनचाही समावेश आहे. या आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे मानखुर्द पोलिसांनी सांगितले.
अशा प्रकारे टोळीचे बिंग फुटले
मानखुर्द टी जंक्शन येथे २१ जुलै रोजी २५ वर्षीय तरुण मानखुर्द रेल्वेस्थानक येथे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होता. त्यावेळी दुचाकीवरून दोन जण आले. त्यांनी तरुणाची नजर चुकवून त्याच्या हातातील मोबाईल खेचून धूम ठोकली. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी भादंवि कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवाजीनगर येथून एकाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरलेला मोबाईल विकणाºयाची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल विकत घेणाºयाच्याही मुसक्या आवळल्या. चौकशीदरम्यान पोलिसांनी १० लाख ८५ हजार रुपयांचे ३१ मोबाईल जप्त केले. हे सर्व मोबाईल चोरीचे असून या मोबाईलची विक्री नेपाळ, उत्तर प्रदेश, कोलकात्ता येथे विकत असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या तरुणाची कसून चौकशी केली असता त्याने इतर 5 साथीदारांची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांनाही तुरुंगात धाडले.
आरोपींचे नावे गुपित…
या कारवाईत पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. या आरोपींच्या अटकेमुळे मुंबईससह अन्य ठिकाणांचे मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच या टोळीत अनेक सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहेत. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गुपित ठेवण्यात आल्याचे मानखुर्द पोलिसांच्या तपासी पथकाने सांगितले.
तपास करणारे मानखुर्द पोलिसांचे पथक…
सदर कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे संजय दरडे, परिमंडळ 6 चे उपायुक्त कृष्णकांत जाधव, ट्रॉम्बे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कोळी, पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आदिनाथ गावडे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, दीपक दळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आंबेकर, दत्ता भोसले, पाटील, पोलीस उपनिरीक्षक साळवी, मोरे, शेळके, सुर्वे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील हवालदार मिर व अन्य पोलिसांनी केली.
ही बातमीही वाचा
1 देशभरात अनेकांची फसवणूक; १ कोटींचे ३११९ मोबाईल जप्त
ही बातमीही वाचा