क्राईम न्यूज

The thief was caught red handed in mumbai | टेम्पो चोराला रंगेहात पकडले

RCF police action | सतर्क असलेल्या आरसीएफ पोलिसांची कारवाई

मुंबई : शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून टेम्पो चोरून पळ काढणा-या एका सराईत आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. सदर कारवाई मुंबई पोलीस दलाच्या आरसीएफ पोलिसांनी केली. या कारवाईत जप्त करण्यात आलेला टेम्पो शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

गस्तीवर असताना आरोपीला लागला पोलिसांच्या हाती

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या सूचनांनुसार आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे, हवालदार घोगरे, पोलीस अंमलदार खैरे, कुते, सानप हे १७ जून २०२२ रोजी पहाटे २.१५ वाजण्याच्या सुमारास गस्त घालत होते. त्यावेळी माजगाव डॉक बस स्टॉप येथे एक टेम्पो चालक थांबला आणि पोलिसांना पाहून सुसाट पळू लागला. गस्तीवरील पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून त्या चालकाच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव अब्दुल रजाक कलाम खान (४१, रा. बेंगनवाडी, शिवाजी नगर, मुंबई) असल्याचे सांगितले. तसेच सदर टेम्पो शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली.

खान हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत आरोपी

टेम्पो चोरी प्रकरणात आरसीएफ पोलिसांनी अटक केलेला अब्दुल रजाक कलाम खान हा सराईत आरोपी असून त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.
1. शिवाजीनगर पोलीस ठाणे
गुरु क्रमांक 65/ 22 कलम 447 भादंवि
गुरु क्रमांक 47/ 22 कलम 122 (ई)भादंवि
गुरु क्रमांक 64/ 19 कलम 8(क), 20, 23 एनडीपीएस कायदा
2. गोंवडी पोलीस ठाणे
गुरु क्रमांक 182/19 कलम 379 भादंवि
3. वडाळा पोलीस ठाणे
गुरु क्रमांक 29 / 11 कलम 379, 34 भादंवि
4. निर्मल नगर पोलिस ठाणे
गुरु क्रमांक 322/ 20 कलम 465, 466, 467, 468 भादंवि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.