क्राईम न्यूज

thane police good work | सपोनि अविनाश महाजन यांची कौतुकास्पद कारवाई

आंध्र प्रदेश-ठाणे गांजा तस्करीची पोलखोल | १० लाखांचा गांजा जप्त, राजस्थान तस्करांसह तिघे अटकेत

ठाणे – आंध्र प्रदेशातील नक्षली भागातून ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या गांजा तस्करीची पोलखोल करण्यात आली आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखा ५ च्या पथकाने (thane police good work) केली. या कारवाईत राजस्थानच्या २ तर ठाण्यातील एकाला बेड्या ठोकण्यात आल्या असून १० लाखांचा १०० किलो गांजा आणि कार असा एकूण १९ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात गुन्हेगारी, ड्रग्स तस्करीला उधाण आले आहे. या सर्वांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी कारवाई करण्याच्या सूचना सर्वच पोलीस ठाण्यांना व विशेष पथकांना दिल्या. या सूचनांचे पालन करत गुन्हे प्रकटीकरण शाखा ५ च्या पथकाने कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेंतर्गत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन यांना गांजा तस्कर करणाºयांची माहिती खबºयाने दिली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घोडबंदर मार्गावरील ओवळा नाका परिसरातल्या लोढा स्प्लेन्डोरा येथे सापळा लावला. खबºयाने सांगितल्यानुसार तेथे आरजे/०६-सीएफ-१४९६ या क्रमांकाची कार तेथे आली. पोलिसांनी त्या कारला घेरले. कारमधील तिघांची चौकशी केली असता त्यांची नावे महिपालसिंग देवीसिंग चुन्डावत (२७, रा. राजस्थान), रमेशचंद्र चंपालाल बलाई (२३, रा. राजस्थान), प्रमोद श्रीराम गुप्ता (३४, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम) असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान कारची झडती घेतली असता ८ लाख रुपयांचा ८० किलो गांजा आढळला. गांजा बाळगल्या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात (गु.र. क्र. ३८९/२०२२) एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (ब), २०(क), २९ नुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी प्रमोद गुप्ता याने एका हॉटेलमधील रुममध्ये लपवून ठेवलेला २० किलो गांजा तपासादरम्यान जप्त करण्यात आला.

ही कौतुकास्पद कारवाई उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि विकास घोडके, पोनि अरुण किस्सागर, सपोनि भुषण शिंदे, अविनाश महाजन, पोउपनि मिरी शिवाजी कानडे, शशिकांत सालदूर, हवालदार सुनिल रावते, रोहीदास रावते, सुनिल निकम, अजय फराटे, जगदिश न्हावळडे, संदिप शिंदे, शशिकांत नागपुरे, माधव वाघचौरे, पोना तेजस ठाणेकर, उत्तम शेळके, रघुनाथ गार्डे, अंमलदार यश यादव यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.