Servant steals from photographer’s house | फोटोग्राफरच्या घरात नोकराने केली चोरी
६ लाख ४६ हजारांचे दागिने पळवणाºयाला ठोकल्या बेड्या

मुंबई : व्यवसायने फोटोग्राफर असलेल्या व्यक्तीच्या घरातून ६ लाख ४६ हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाºया नोकराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सदर कारवाई बांगुर नगर पोलिसांनी केली. या कारवाईत २ लाख 2 ९६ हजार ३० रुपयांची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे.
घरमालक बाहेर गेला आणि नोकरी दागिने पळवले
गोरेगाव पश्चिम परिसरात फोटोग्राफर राहतात. कामानिमित्त ते घराबाहरे गेले होते. त्यावेळी घरकाम करणारा भगवानलाल कामत (वय 32) याने बेडरूममधील कपाटात असलेले सहा लाख 46 हजारांचे दागिने पळवले. दरम्यान, घराचे मालक परत आले असता दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ बांगुर नगर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलिसांनी नोकराविरुद्ध (गु.र.क्र. 490/2022) भादंवि कलम 381 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना खबºयाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी भगवानलाल याला मुंबईतील जोगेश्वरी परिसरातून अटक करण्यात आली.
नक्षली भागातून चोरीचा ऐवज जप्त
आरोपी भगवानलाल याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपी भगवानलालने चोरलेला ऐवज बिहार राज्यातील नालंदा, मुंगेर,बिहार शरीफ, रामकृष्ण नगर, कदमकुआ या नक्षल भागात लपून ठेवला होता. सदर ठिकाणी जाऊ न पोलिसांनी चोरलेल्या एकूण ऐवजा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली होती नमूद ठिकाणी जाऊन कौशल्य पूर्ण तपास करून चोरलेल्या 6 लाख 46 हजार रुपयांच्या दागिन्यांपैकी 2,96,030 रुपयांचे दागिने जप्त केले.
यांनी केली कारवाई
सदर कारवाई परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकरी सपोनि योगेश रामेकर, हवालदार प्रमोद दळवी, पोना विनय सोनावणे, राजेंद्र गळवे, अंमलदार संदीप तिकांडे, नईम शेख यांनी केली.