क्राईम न्यूज

Robber in long distance train arrested | लांब पल्ल्याच्या गाड्यात चो-या करणाºयाला अटक

लोहमार्ग पोलीस दलाच्या एसटीएफ युनिटच्या कारवाईमुळे मुंबई, ठाण्यातील ५ गुन्ह्यांची उकल

मुंबई : लांबपल्ल्याच्या गाड्यांतून प्रवास करणाºयांचा मुद्देमाल पळवणाºया एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस दलाच्या (mumbai railway police) गुन्हे शाखेच्या एसटीएफ पथकाने केली. या कारवाईमुळे मुंबई व ठाण्यातील ५ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कारवाईदरम्यान आरोपीकडून ९९ हजार २५७ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वेत चोºया करणाºयांनी धुमाकूळ घातला होता. या गुन्ह्यांनाा आळा घालण्यासाठी आरोपींना तुरुंगात धाडण्याच्या सूचना नव्याने चार्ज हाती घेतलेल्या मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांसह गुन्हे शाखेची सर्वच पथके आरोपीचा शोध घेऊ लागली. लोहमार्ग पोलिसांची विशेष शोधमोहीम सुरू असताना एएटीएफ पथकाला लांब पल्ल्याच्या गाड्यामध्ये चोºया करणाºया सराईत आरोपींची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातील बुकिंग कार्यालयाजवळ सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आतापर्यंत् केलेल्या चोºयांची माहिती दिली. आरोपी अय्युबअली समीरुद्दीन शेख (वय 43, रा. वार्ड नं .04 , कॉलेज टोला , पलासमनी , पो.बहादुरगंज , जिल्हा किशनगंज, राज्य बिहार) हा पोलिसांच्या हाती लागल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (गुन्हा रजि नं .284 / 2022 कलम 379 भादंवि), कुर्ला (गुन्हा रजि नं .1070 / 2022 कलम 379 भादंवि) (गुन्हा रजि नं . 1364/2022 कलम 379 भादंवि), ठाणे (गुन्हा रजि नं . 1076/2022 कलम 379 भादंवि), (गुन्हा रजि नं .669 / 2022 कलम 379 भादंवि) येथे दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. कारवाईदरम्यान या आरोपीकडून 25 हजारांची सोन्याची अंगठी, 25 हजारांची सोन्याची चेन, 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेतत.

या गुन्ह्याची उकल मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, मध्य लोहमार्ग परिमंडळचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सचिन कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे)अरशुददीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज साठे, पोलीस उपनिरीक्षक दिपक शिंदे, सहा पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खुस्पे, महिला हवालदार मयेकर, हवालदार घार्गे, नलगे, कुभांर, दरेकर, फडके, पोलीस नाईक पाटील, महागावकर, थोरात, दिघे, पाटील, अंमलदार भराडे यांनी केली.

 

खालील बातमीही वाचा…

ठाण्यातील ठेकेदाराच्या हत्याकांडाचा उलगडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.