Prostitution in Mumbai | 33 women from West Bengal came to Mumbai for work and turned to prostitution | कामानिमित्त मुंबईत आल्या आणि पश्चिम बंगालच्या ३३ महिला वेश्यावव्यसायाकडे वळल्या
Mumbai Police, Unit 7 | मुंबई पोलीस सह आयुक्तांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट ७ ने दलांना ठोकल्या बेड्या
मुंबई : मुंबईत वेश्याव्यवसाय चालवणा-यांचा पर्दाफाश झाला आहे. पश्चिम बंगालमधून कामानिमित्त मुंबईत आलेल्या ३३ महिला व मुली वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये फसल्या. सदर कारवाई मुंबई सह पोलीस आयुक्त (गुन्हे) सुहास वारके यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट ७ च्या पथकाने केली. या कारवाईत ८ ग्राहक, ६ दलाल व ग्राहकांना सेवा पुरवणाºया ९ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच ३३ महिलांची यातून सुटका करण्यात आली.
व्ही. पी. रोडमध्ये इमारतीत थाटला वेश्याव्यवसाय
मुंबईतील व्ही. पी. रोड परिसरातील गजानन फ्लोअर मिलच्या समोरील दोन मजली इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू करण्यात आला होता. याबाबतची माहिती मुंबई सह पोलीस आयुक्त सुहास वारके यांना मिळाली. सदर माहितीच्या आधोर गुन्हे प्रकटीकरण १ चे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ७ च्या पथकाने कारवाईसाठी सापळा लावला.
बोगस ग्राहक बनवून यशस्वीरित्या कारवाई
या कारवाईसाठी युनिट ७ चे विशेष पथक नेमण्यात आले. या पथकांनी बोगस ग्राहक तेथे पाठवले. बोगस ग्राहकांना वेश्याव्यवसायासाठी मुली / महिला दाखवत असताना युनिट ७ च्या पथकाने धाड टाकली. बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय चालवत असल्या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. ३६३/२०२२) भादंवि कलम ३७०(२)(३), ३४ सह स्त्री व मुलींचा अनैतिक व्यापार प्रति अधिनियम कायदा कलम ३, ४, ५, ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे युनिट ७ चे पथक
सदर कारवाई गुन्हे प्रकटीकरण १ चे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार, युनिट ७ च्या प्रभारी पोलीस निरीक्षक प्रिया थोरात, पोलीस निरीक्षक उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर, पोलीस उपनिरीक्षक धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस उपनिरीक्षक परबळकर, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाईक, धुमाळ, हवालदार पवार, शिंदे, बडगुजर, पोलीस नाईक भोई, जाधव, राऊ त, शिंदे, खरे् पाटील, सावंत, पोलीस नाईक (चालक) कदम, महिला अंमलदार शेख, पोलीस अंमलदार (चालक) राठोड, धुमाळ, गुसिंगे यांनी केली.

ही बातमीही वाचा…
16-year-old girl from Mumbai was handcuffed in Pune | मुंबईतून १६ वर्षीय मुलीला पळवणा-याला पुण्यात ठोकल्या बेड्या