महाराष्ट्र

Police gave life to the girl who committed suicide | आत्महत्या करणाºया मुलीला पोलिसांनी दिले जीवदान

Even though ssc got 58%, she committed suicide under the train | दहावीला ५८ टक्के मिळाले तरीही रेल्वेखाली आत्महत्या करण्यास गेली...

परभणी – दहावी परीक्षा उत्तीर्ण झाली. ५८ टक्के मिळाले तरी सेलू येथील रेल्वेस्थानकात विद्यार्थिनी आत्महत्या करण्यास गेली. मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी मुलीला रोखले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे विद्यार्थिनीचे प्राण वाचले. पोलिसांनी तिचे समुपदेशन करून तिला सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले.

सेलू येथील रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास नांदेडहून मनमाडकडे जाणारी डेम्यू रेल्वे स्थानकात आली. त्यावेळी रेल्वेजवळ एक मुलगी ये-जा करत असल्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास नाटकर, पोलीस कमर्चारी परसराम सूयवंशी यांच्या लक्षात आले. त्यांनी या मुलीला पोलीस चौकीत आणले. तिची चौकशी केली असता त्या मुलीने मानसिक तणावातून आत्महत्या करण्यासाठी स्थानकावर आल्याचे पोलिसांना सांगितले.

मला दहावी परीक्षेत ५८ टक्के गुण मिळाले. पोलीस दलात सेवा करण्याची इच्छा आहे. मात्र आर्थिक अडचणींमुळे पुढील शिक्षणासाठी घरच्या मंडळींचा विरोध आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असे त्या मुलीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्यांना रेल्वे स्थानकात बोलावून घेतले. पोलिसांनी व पालकांनी मुलीची समजूत काढली. पोलीस कर्मचारी नाटकर, सूयर्वंशी, मनीष कदम यांनी आर्थिक मदतीची तयारी दर्शवित मुलीचे शिक्षण सुरू ठेवा, असे आईला सांगितले आणि मुलीला तिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, रेल्वे पोलीस नाटकर आणि सूर्यवंशी यांच्या सतकर्तेमुळे विद्यार्थिनीचे प्राण वाचले. त्यामुळे या पोलिसांचे सर्वांनी कौतुक करून त्यांना सन्मानित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.