Mumbai Police constable Nikita Mhatre preserved humanity on Women’s Day / महिला दिनी पोलीस अंमलदार निकीता म्हात्रे यांनी जपली माणुसकी

मुंबई : जागतिक महिला दिनी जगभरात महिलांनी केलेल्या कर्तव्याचा गौरव होत असताना मुंबईच्या पोलीस अंमलदार निकिता म्हात्रे (Mumbai Police constable Nikita Mhatre) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. सुनेच्या मारहाणीत जखमी झालेल्या ७२ वर्षीय सासूला वेळीच रुग्णालयात नेल्याने तिला जीवदान मिळाले. कर्तव्यापलीकडे जाणून माणुसकी जपताना निकीताम्हात्रे यांनी जखमी अवस्थेत महिलेला लहान मुलाप्रमाणे उचलून चौथ्या मजल्यावरून खाली आणले.
१०० नंबरवर फोन
आला आणि…
खार परिसरारत राहणाºया रेणुबाई वाते (७२) यांना तीन मुले आहेत. तिघांचेही लग्न झाले आहे. या मुलांकडे रेणुबाई ठराविक कालावधीपर्यंत राहत. सध्या मधल्या मुलाकडे त्या राहत होत्या. वयोमानाने तसेच शस्त्रक्रियेमुळे त्यांना चालण्यास त्रास व्हायचा. या त्रासामुळे त्यांनी उभ्याने लघुशंका केली. याचा राग अनावर झाल्याने सूनबाई सुजाता वाते हिने वॉकरने त्यांना मारहाण केली. जबर फटका बसल्याने रेणुबाईना उठता येत नव्हते. अशा अवस्थेत सुजाताने रेणुबार्इंना मोठ्या मुलाच्या घरी आणून सोडले. त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, नातवालाच आर्जीची किव आली आणि त्याने १०० नंबरवर फोन केला. मुंबई पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातून बिनतारी संदेश जारी करण्यात आला. सदर संदेश प्राप्त होताच खार पोलीस ठाण्याच्या मोबाईल व्हॅन क्रमांक ५ वर कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक घोगरे, अंमलदार घारगे, निकीता म्हात्रे हे तात्काळ खारदांडा येथे दाखल झाले. मुकामार लागल्याने उभा राहता न येणाºया रेणुबाई यांना निकिता म्हात्रेंनी अलगद उचलून चार मजले खाली घेऊ न आल्या. त्यानंतर पोलीस गाडीने वांद्रे येथील भाभा रुग्णालय येथे दाखल केले.
सूनबाई गेली तुरुंगात…
वृद्ध सासूला मारहाण केल्या प्रकरणी खार पोलिसांनी (गु. र. क्र. २१६/२०२३) भादंवि कलम ३२४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून सुजाता वाते हिला अटक करण्यात आली. सध्या ती पोलिसांच्या कोठडीत आहे.
सन्मान कर्तव्याचा !

पोलीस अंमलदार निकीता म्हात्रे यांनी प्रसंगावधान राखत आजीबाईला रुग्णालयात दाखल करण्यासाठी बजावलेल्या कर्तव्याची दखल सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण यांनी पशस्तीपत्र व १० हजार रुपयांचे रिवॉर्ड दिले. भविष्यात अशाच प्रकारे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतर्क रहा, असे आवाहन सत्य-नारायण यांनी सर्व पोलिसांना या प्रसंगी केले.