ब्रेकिंग

Onion chaal set on fire by an unknown person in Daund | दौंडमध्ये अज्ञाताने पेटवली कांदा चाळ

700 पिशव्या जळून खाक, शेतकºयाचे ५.२५ लाखांचे नुकसान

दौंड : हरिभाऊ बळी
दौंड तालुक्यात अज्ञात इसमाने कांदा उत्पादकाची कांदा चाळ पेटवून दिली. या आगीत ५ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, या प्रकरणी यवत पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध (गु. र. क्र. 753/2022) भादंवि कलम 435 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

एकीकडे शेतीमालाला भाव नाहीतर दुसरीकडे पावसाचा कहर सुरू असल्याने चक्रव्युहात अडकलेल्या कांदा उत्पादक शेतकरी यशवंत विठ्ठल काळे (वय 55, रा. कानगाव, ता. दौंड जिल्हा पुणे) यांच्या वाट्याने मोठे संकट आले. अज्ञाताने त्यांच्या कांदा साठवून ठेवलेल्या (चाळीला) वखारीला आग लावली. या आगीत 700 पिशव्या एवढा कांदा होता.कांद्याला भाव नाही विक्री व्यवस्थाही विस्कळीत झाल्याने काळे यांनी कांदा वखारीत साठवून ठेवला होता.भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल या आशेने शेतकरी यशवंत काळे यांनी कांदा वखारीत ठेवला होता. परंतु अज्ञातांनी त्या वखारीला आग लावली.यात काळे यांची वखार जळून खाक झाली. यामुळे यांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान या घटनेने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.