महाराष्ट्र

Mumbai Police Constable Sujit Pawar passed away / मुंबई पोलिसांनी गमावला आणखी एक सहकारी

रायगड येथील मूळगावी आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई : कर्तव्य बजावताना निधन झाल्याने मुंबई पोलीस दलाने हवालदार (बक्कल नं. ३१४५३) सुजित पवार यांच्या रूपात आणखी एक सहकारी गमावला. ते ४९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी रेणुका, मुलगा साहिल, मुलगी रितीका व सून आदी परिवार आहे. शनिवार १८ मार्च २०२३ रोजी त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मूळगाव लोणवली वाडी येथे नेण्यात आले आहे. तेथे शासकीय इतमामात सुजित पवार यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील.

आतापर्यंतचा कर्तव्याचा प्रवास

२६ जुलै १९७३ रोजी पवार हे पोलीस अंमलदारपदी पोलीस खात्यात भरती झाले. त्यांनी सुरुवातीला ‘ल’ विभाग येथे कर्तव्य बजावले. त्यानंतर अनुक्रमे अंधेरी, मालाड पोलीस ठाण्यात कर्तव्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या ते सांताक्रूझ पोलीस ठाण्यात कर्तव्याला होते. राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यासाठी विशेष बंदोबस्ताकरिता त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यांतर्गत तैनात करण्यात आले. त्यावेळी अचानक छातीत कळ आल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सदर बाब लक्षात येताच कर्तव्यावरील इतर सहाकाºयांनी त्यांना तात्काळ जी.टी. रुग्णालयात नेले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याांचा मृत्यू झाला.

भावपूर्ण श्रद्धांजली…

सांताक्रूझ पोलीस ठाण्यात कर्तव्याला असताना त्यांनी आजवर सत्र न्यायालयात/गुन्ह्या संदर्भात उत्तमरित्या कामगिरी केल्याने त्यांना मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले होते. मनमिळावून स्वभाव असलेले पवार यांचे अचानक जाणे सांताक्रूझ पोलिसांसह राज्य पोलीस दलातील सर्वांसाठी धक्कादायक ठरले. या दु:खातून सावरण्यासाठी पवार कुटुंबियांना बळ मिळो, हीच प्रार्थना!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.