Mumbai Cyber Crime | मुंबई सायबर क्राईम पथकाने राजस्थान, यूपीच्या भामट्यांना ठोकल्या बेड्या
महाराष्ट्रासह देशभरात आॅनलाईन लुटणा-या टोळीच्या अटकेमुळे २६९ गुन्ह्यांची होणार उकल

मुंबई : बृहन्मुंबई पोलीस कायम सतर्क असल्याचे पुन्हा एका गुन्ह्याच्या तपासामुळे सिद्ध झाले आहे. सायबर क्राईम शाखेच्या पथकाने राजस्थान व यूपीमधून कारवाया करून आॅनलाईन लुटणाºया टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी आॅनलाईनरित्या वस्तू विकणाºयांना खासकरून टार्गेट करत. नामांकित साईडवरून देशभरातील २६९ हून अधिक नागरिकांना यांनी लुटल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून त्यांपैकी १४ गुन्हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी दिली.
फर्निचर खरेदीच्या बहाण्याने १७ लाख ८२ हजारांची फसवणूक
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह देशभरात आॅनलाईन लुटणारे नवनवे फंडे वापरत आहेत. याचा प्रचिती मुंबई शहरात आली. नुकतीच सूरतहून मुंबईत बदली झालेल्या राजेशकुमार (बदलेले नाव) यांना आपले फर्निचर विकायचे होते. त्याकरिता त्यांनी ओएलक्स सूरत नावाचे अॅप डाऊ लोड केले. त्या अॅपवर फर्निचरच्या सेटचे फोटो अपलोड केले. सदर फोटो भामट्यांच्या निदर्शनास पडताच त्यांनी त्या राजेशकुमार यांच्याशी संपर्क साधून फर्निचर विकत घेण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. फर्निचरचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी भामट्याने राजेशकुमार यांनाच एक लिंक पाठवली. सदर लिंक ट्रान्सफर केली तर फर्निचरचे पैसे पाठवता येतील, असे भामट्याने सांगितले. त्याया बोलण्यावर विश्वास ठेवून राजेशकुमार यांनी व्हॉट्सअॅपद्वारे आलेली पेमेंट लिंक स्कॅन करताच त्यांच्या खात्यातून ९ हजार रुपये ट्रान्सफर झाले. सदर रक्कम राजेशकुमार यांना परत देण्याच्या पुन्हा लिंक पाठवली. त्या लिंकद्वारे अवघ्या २ तासात १२ वेळा ट्रान्झेक्शन करून भामट्यांनी राजेशकुमार यांच्या बँक खात्यातून १७ लाख ८२ हजार रुपये भामट्यांनी लुटले. सदर बाब लक्षात येताच राजेशकुमार यांनी तात्काळ सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली. या प्रकरणी उत्तर प्रादेशिक विभाग सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (गु. र. क्र. ३९/२०२२) भादंवि कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, १२०(ब) सह माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क), ६६ (ड) नुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अशा प्रकारे गुन्ह्यांची उकल
करण्यात पोलिसांना यश
या गुन्ह्याप्रमाणे देशभरात अनेकांना अशाच प्रकारे लुटण्यात आल्याच्या नोंदी संबंधित राज्य पोलीस विभागांनी केल्याचे तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आले. या गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिली. त्यानुसार सायबर गुन्हे शाखेचे विशेष पथक तपासाला लागले. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता भामटे उत्तर प्रदेश व राजस्थानमध्ये असल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित राज्यांमध्ये सापळा लावून आरोपी सवसुख ऊ र्फ सर्वसुख खुट्टा रुजदार ऊ र्फ समशु (वय ३७), तुलसीराम रोडलुला मीणा (२५), अजित शिवराम पोसवाल (१९), इरसाद सरदार (२४) यांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २ लाखांची रोकड, ९ मोबाईल फोन, ३२ वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड, चेकबूक, ४ विविध कंपन्यांचे सीमकार्ड जप्त केले आहेत.
यांच्यामुळे आरोपी लागले हाती…
देशभरात धुमाकूळ घातलेल्या या टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, उपायुक्त बाळसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस आयुक्त राजचंद्र लोटलीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय चंदनशिवे, पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सविता कदम, संदीप पाचगणे, पोउपनि निवृत्ती बावस्कर, राहुली खेत्रे, प्रकाश गवळी, पोना सचिन सावंत, गणेश आयरे, हवालदार सुहास नलावडे, किरण वसईकर, उतेज परब, सुनील नाडगौडा, सोनाली दळवी, हबीब सय्यद, राहुल बोरसे, संतोष गलांडे, प्रताप जाधव, कमलेश सोनावणे, अभिजीत देसाई, अशोक शिंदे, नितेश सूर्यवंशी, प्राची मुळीक, साक्षी नगरकर यांनी केला.
खालील बातमीही वाचा…