क्राईम न्यूज

crime branch mumbai | Mumbai Crime Branch | जन्मठेपेच्या शिक्षेतील फरार गँगस्टर गजाआड

हवालदार माने यांची कौतुकास्पद कारवाई

  मुंबई :खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न, अपहरण यांसारख्या १५ गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सराईत गँगस्टरला पुन्हा गजाआड करण्यात आले. ही कौतुकास्पद कारवाई हवालदार दिलीप माने यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण (Crime Branch Mumbai ) शाखा कक्ष १० च्या पथकाने केली. जागतिक कोविडच्या संकट काळात या आरोपीने २०२० साली त्याला सुरक्षेच्या कारणामुळे औरंगाबाद कारागृहातून तात्पुरते मुक्त करण्यात आले होते. ठराविक वेळेनंतर तो पुन्हा कारागृहात हजर झाला नव्हता.

     दोन वर्षांपूर्वी जगावर कोविड-१९ चे संकट आले. या काळात संसर्ग पसरू नये म्हणून गृह खात्याने विशेष निर्णय घेतला. या निर्णयानुसारे लाखोंच्या संख्येने राज्यभरातील कारागृहातील कैद्यांना सोडण्यात आले. या कैद्यांमध्ये कल्याण, ठाणे, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात १९९५ जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ग्रब्रियल हंस मेबन (६२) याचाही समावेश होता. दरम्यानच्या काळात लसीकरण मोहिमेमुळे कोविडवर बऱ्याच अंशी मात करता आली. त्यामुळे पुन्हा तुरुंगात हजर राहण्याच्या सूचना कारागृह प्रशासनाने कैद्यांना दिल्या. त्या आदेशानुसार १७ मे २०२२ रोजी मेबन याला कारागृहात पुन्हा येणे अनिवार्य होते. मात्र तेथे आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र ग्रब्रियल भेटला नाही. अखेर २ डिसेंबर २०२२ रोजी कारागृहाचे सुपरवायझर अनिल शिर्के यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी (गु.र.क्र 1225/2022) भादंवि कलम २२४ नुसार गुन्हा केला.
    दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी फरार आरोपींना तुरंगात धाडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाची सर्व पथके आपापल्या परीने आरोपींचा शोध घेऊ लागले. अशाच प्रकारे आरोरींवर लक्ष ठेवून असताना गुन्हे शाखा कक्ष १० च्या पथकाचे हवालदार माने यांना ग्रब्रियल हंस मेबन याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे साकीनाका परिसरात सापळा लावून कक्ष १० च्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. पुढील कावाईसाठी त्याला एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
   सदर कारवाई पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ज्ञानेश्वर चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण १ चे उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पश्चिम) काशिनाथ चव्हाण, युनिट १० चे प्रभारी पोनि दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनराज चौधरी, हवालदार शेटे, धारगळकर, दिलीप माने, धनवडे, नलावडे, पोना जगताप, अंमलदार निर्मळे, चव्हाण, महिला पोलीस अंमलदार सोनावणे यांनी केली.

ही बातमी वाचा

राजस्थानच्या बोगस महाराजाच्या नावाने फसवणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.