क्राईम न्यूजमेट्रो सिटी न्यूज

Mobile thief arrested / सराईत मोबाईल चोराला अटक

चार गुन्ह्यांची उकल, ५.८३ लाखांचे मोबाईल जप्त

भिवंडी : दुचाकीवरून नागरिकांचे मोबाईल पळवणाºया एका सराईत आरोपीला (Mobile thief arrested ) अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भिवंडीच्या कोनगाव पोलिसांनी केली. या कारवाईमुळे ४ गुन्ह्यांची उकल झाली असून आरोपींकडून ५ लााख ८३ हजारांचे ६ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

भिवंडी परिसरातील रांजणोली बायपास पुलाखाली एक व्यक्ती रिक्षाची वाट पाहत होते. बराच वेळ रिक्षा येत नसल्याने तो मोबाईल गेम खेळू लागला. खेळण्यात मग्न असल्याचे पाहून दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्या व्यक्तीच्या हातातून मोबाईल खेचून सुसाट निघून गेला. या प्रसंगातून स्वत:ला सावरत त्याने कोनगाव पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी (गु.र.क्र. २३/२०२३) भादंवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपीची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार सापळा लावून सरफराज अजमल खान (२८, रा. नारपोली, भिवंडी) याच्या मुसक्या आवळल्या. तपासादरम्यान त्याच्याकडून पोलिसांनी ६ मोबाईल जप्त केले. हा आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने कोनगावचे ३ तर शांतीनगर पोलीस ठाण्याचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.

यांनी केली गुन्ह्याची उकल

या गुन्ह्यांची उकल ठाणे शहर पोलीस दलाचे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, परिमंडळ २ चे उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजीत पाटील, हवालदार अरविंद गोरले, अमोल गोरे, मधुकर घोडसारे, पोलीस नाईक गणेश चोरगे, नरेंद्र पाटील, अंमलदार हेमंत खडसरे, हेमराज पाटील या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.