loan on fake gold news in marathi | नकली सोने तारण ठेवून ज्वेलर्सवाल्याची फसवणूक
तीन आरोपींना कस्तुबा मार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्याा

मुंबई : मित्राच्या वडिलांना कॅन्सर झाला आहे, असे सांगून बोरिवली पूर्व परिसरातील ज्वेलर्स दुकानात २ नकली चेन ठेवून १ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक करणा-यांना अटक करण्यात आली आहे. केवळ कमिशनसाठी आरोपींकडून एकमेकांना चेन दिली होती. या तिन्ही आरोपींना १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अशा प्रकारे चेन ठेवल्या गहाण
बोरिवली पूर्व परिसरात प्रिन्स ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात ७ आॅगस्ट रोजी मालक हितेश जैन हे बसले होते. त्यावेळी राहुल पेडणेकर तेथे आला. माझ्या मित्राच्या वडिलांना कॅन्सर झाला आहे. त्यांच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे, असे सांगून दोन चेन गहाण ठेवून त्याने १ लाख १५ हजार रुपये नेले. दरम्यान १० आॅगस्ट रोजी राहुल पुन्हा चेन गहाण ठेवण्यासाठी त्यावेळी दुकानात केवळ मॅनेजर प्रवीण वैष्णव होता. मालक नसल्याने प्रवणीने दोन दिवसांनंतर येण्याचा सल्ला राहुलला दिला. तसेच राहुल चेन गहाण ठेवण्यास आल्याची माहिती मालकाला दिली. दोन दिवसांत पुन्हा चेन घेऊ न आल्याने त्यांना संशय आला. त्यांनी वैष्णवला आधी गहाण ठेवलेल्या चेन तपासण्यास सांगितल्या असता त्या बोगस असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी कस्तुबा मार्ग पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. ११६५ / २०२२) भादंवि कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींना धाडले तुरुंगात
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली कस्तुबा मार्ग पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक तपास करू लागले. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता आरोपी राहुलची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी जोगेश्वरी परिसरातून राहुलच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चेन गहाण ठेवण्यास देणाºयाची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमित विचारे याला ताब्यात घेतले. त्यानेही चौकशीदरम्यान नरसिंग ऊ र्फ मुन्ना अली याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याही मुसक्या आवळल्या. कमिनश मिळण्याच्या हवासापोटी या तिघांनी एकमेकांना नकली चेन गहाण ठेवण्यासााठी दिल्याचे तपासादम्यान निष्पन्न झाले.
यांनी केला गुन्ह्याचा उलगडा
सदर गुन्ह्याचा उलगडा उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विरेंद्र मिश्र, उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे प्रकटीकरण) शशीकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ओम तोटावार, पोलीस उपनिरीक्षक राहुल वाळुंजकर, पोलीस नाईक संजय सर्वेकर, मनोज परिट, हेमंत विचारे, संजय पाटील, प्रवीण टिक, निलेश कोरगावकर, सागर पवार, (परिमंडळ १२) कलीम शेख (सायबर क्राईम एक्सपर्ट) यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला.
ही बातमीही वाचा