क्रीडा व मनोरंजन

khelo india l खेलो इंडियात मुला-मुलींच्या संघांची कबड्डीत विजयी सलामी

महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने आंध्र प्रदेशचा १९ गुणांनी तर मुलींच्या संघांने झारखंडचा ४५ गुणांनी धुव्वा उडवला

Maharastra Sports

मुंबई : चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रंगलेल्या महाराष्ट्राच्या मुलांच्या कबड्डी संघाने आंध्र प्रदेशचा तब्बल १९ गुणांनी तर मुलींच्या संघांने झारखंडचा ४५ गुणांनी उडवला धुव्वा उडवला. हा विजयी सलामी सामना हरियाणाच्या भूमीतल्या ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉप्लेक्समध्ये रंगला. उत्तमरित्या कबड्डीत कौशल्य दाखवल्याने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी कबड्डीच्या मुला-मुलींच्या संघांतील खेळाडूंचे अभिनंदन केले.

khelo-india-maharashtra-Boy-team
उत्तमरित्या पकड करताना महाराष्ट्राचा संघ

महाराष्ट्राच्या आक्रमक खेळाडूंनी आंध्र प्रदेशला केले आॅलआऊट l Maharashtra boys beat Andhra Pradesh by 19 points while girls beat Jharkhand by 45 points

महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने तब्बल ४८ गुण केले. त्या गुणांविरुद्ध गणफलक नेल्याच्या प्रयत्न करणाºया आंध्र प्रदेशच्या संघाला केवळ २९ गुणांपर्यंत मजल मारता आली. सुरुवातीला अटीतटीचा होत असलेला सामना कालांतराने एकतर्फी झाला. महाराष्ट्राने पहिल्याच चढाईत गुण पटकावला. डु ओर डाय रेडमध्येही गुण मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्राने आक्रमक खेळ केला. चार विरूद्ध पाच गुणांची आघाडी घेतली. त्यांनी चार गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला आॅल आऊट केले. त्यामुळे सामना बारा विरूद्ध सहा असा झाला. मात्र महाराष्ट्राच्या आक्रमक झालेल्या खेळाडूंनी आंध्र प्रदेशला आॅलआऊट केले. त्यामुळे त्यांचे पंधराविरुद्ध सोळा गुणफलक झाले. अठराव्या मिनिटाला सतरा आणि सतरा अशी बरोबरी झाली. पहिल्या हाफमध्ये महाराष्ट्राने तीन गुणांनी आघाडी केली. त्यावेळी गुण २० विरुद्ध १७ गुण होते. दुसºया हाफमध्ये महाराष्ट्राच्या संघ आणखीच आक्रमक झाला. कबड्डी पट्टूंनी चढाई आणि बचावातही उजवा खेळ केला. त्यामुळे आठ मिनिटे बाकी असताना जवळपास दुप्पट गुण मिळवले. अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्राने ४८ गुण मिळवून खेलो इंडिया युथ गेम्समध्ये विजय नोंदवला.

 khelo-india-maharashtra-gir
उत्तमरित्या खेळताना मुलींचा संघ

कोल्हापूर आणि अहमदनगरच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी l  Spectacular performance of Kolhapur and Ahmednagar players

अहमदनगरचा शिवम पठारे आणि कोल्हापूरचा पृथ्वीराज चव्हाण यांनी चढाईत नेत्रदीपक कामगिरी केली. या दोघांच्या बळावरच महाराष्ट्राला गुण मिळवता आले. दादासाहेब पुजारी, रोहन तुपारे, साईप्रसाद पाटील, जयेश महाजन यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. त्यामुळे संघाला भरभक्कम आघाडी घेता आली. सामन्यात आऊ आउट झाल्याने महाराष्ट्र सहा गुणांनी पिछाडीवर पडला होता. मात्र स्पर्धा म्हटल तर बाजी पलटायला वेळ लागत नाही. अगदी तसाचा सामना रंगत गेला आणि आक्रमक खेळी करून महाराष्ट्र संघाच्या स्पर्धकांनी कौतुकास्पदरित्या खेळ केला.

मुलीच्या संघाचीही चमकदार कामगिरी l The brilliant performance of the girl’s team too

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कबड्डीत मुलांनंतर मुलींनीही चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उंचावले. या मुलींनी तब्बल ४५ गुणांनी झारखंडचा धुव्वा उडवला. ६० विरुद्ध १५ असा हा सामना रंगला. पंचकुलातील ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सामन्याच्या सुरुवातीच्या पाचव्या मिनिटाला झारखंडवर पाच-शून्य अशी गुणांची आघाडी घेतली. पहिल्या हापमध्ये १५ गुणांची आघाडी घेतली होती तर दुसºया हापची १० मिनिटे शिल्लक असताना महाराष्ट्राच्या मुलींनी तब्बल ४५ गुण पटकावले तर झारखंडने अवघे १३ गुण होते. सामन्याला एक मिनिट उरला असताना झारखंडला आॅल आऊट केले. त्यामुळे गुणफलकावर लागले ६० गुण. झारखंडचे होते अवघे १५ गुण.

यांनी वाढवला खेळाडूंचा उत्साह
प्रशिक्षक गीता साखरे-कांबळे, सोनाली जाधव यांनी तर टीम व्यवस्थापक अनिल सातव, महेश खर्डेकर, ज्ञानेश्वर खुरांगे, सपोर्ट स्टाफ विजय खोकले, किशोर बोंडे यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला. या सर्वांनी ठरवलेल्या प्लॅननुसार खेळाडूंनी सामन्यात कौशल्य दाखवले.

 

मैदानात जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष l Jai Bhavani, Jai Shivaji’s

महाराष्ट्राच्या मुलींनीही खेळात तरबेज असल्याचे दाखवून दिले. त्यांचा खेळ पाहून उपस्थित असलेल्या मराठी क्रीडाप्रेमींनी जल्लोषात जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव अशा विजयी जयघोष केला.

चढाईत हरजीतसिंग संधू ११ गुण (मुंबई), ऋतुजा अवघडीने ८ गुण मिळवले. पकडीतही ती चमकली. यशिका पुजारीने पाच गुण मिळवले. निकिता लंगोटे आणि कोमल ससाणे यांनी नेत्रदीपक पकडी केल्या. मुस्काने लोखंडे हिनेही उत्कृष्ट बचाव केला. एकंदरीत सांघिक कामगिरीमुळे महाराष्ट्राला एकतर्फी विजय मिळवता आला.

मुलींचा संघ
हरजीतकौर संधू, शिवरजनी पाटील, आरती ससाणे, कोमल ससाणे, रिद्धी हडकर, हषर्दा पाटील, किरण तोडकर, मनिषा राठोड, निकिती लंगोटे, यशिका पुजारी, मुस्कान लोखंडे, ऋतुजा अवघडी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.