आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

khakitil devdoot | खाकीतली माणुसकी | Daughter of Mumbai Police | मुंबई पोलिसांची लेक

एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याच्या लेकीमुळे मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात आणखी एक नोंद

मुंबई : मुंबईचे पोलीस कायम कौतुकास्पद कामगिरी करत असतात, याची प्रचिती वेळोवेळी येत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बोरिवलीत कचºयाच्या कुंडीत नुकतीच जन्मलेली मुलगी सापडली. या मुलीला तात्कळ रुग्णालयात दाखल करून एमएचबी कॉलनी पोलिसांनी तिचा सांभाळ करण्याचे निर्णय घेतला आहे. या मुलीचे नाव ‘एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याची मुलगी’ असे नामकरण करण्यात येणार आहे. या एकूणच प्रसंगामुळे खाकीतल्या माणुसकीचे दर्शन घडले असून, मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण नोंद झाली आहे.

आणि खाकी झाली माय…

बोरिवली पश्चिम परिसरातील शिवाजी नगरातल्या साईबाबा मंदिराजवळ कचºयाची कुंडी आहे. या कुंडीत निर्दयी मातेने जन्म दिलेल्या मुलीला फेकले होते. या कचरा कुंडीशेजारी बॅटरीचे दुकान आहे. रात्रीच्या वेळी दुकान बंद करताना बाळ रडण्याचा आवाज मालकाच्या कानी पडला. आवाजाचा कानोसा घेत तो कचºयाच्या कुंडीजवळ गेला असता त्यात बाळ असल्याचे त्याने पाहिले. सदर माहिती कर्तव्यावर असलेल्या एमएचबी कॉलनी पोलिसांना त्याने दिली. बाळाबाबत समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक शोभा सावंत या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. त्या मुलीची नाळसुद्धा कापण्यात आली नव्हती. ते दृष्य पाहून खाकीतल्या प्रत्येकाचे डोळे पानावले. पोलिसांनी मुलीला तात्काळ कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने त्या मुलीची प्रकृती सध्या ठीक आहे.

मुलीचा सांभाळ करण्याचा निर्णय

Daughter of Mumbai Police
Daughter of Mumbai Police

या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर गोंडस बाळाचा सांभाळ करण्याचा निर्णय एमएचबी कॉलनी पोलिसांनी ठरवले असून त्याकरिता बाल कल्याण समितीकडे पत्रव्यवहार केला आहे. या मुलीला रुग्णालयातून डिचार्ज मिळाल्यानंतर तिला बालकल्याण समितीपुढे हजर केले जाईल व रितसर तिचा सांभाळ करण्यासाठी ताबा घेतला जाणार आहे. महत्त्वाची बाब पोलिसांच्या या लेकीसाठी आतापासून पैशांची जमवाजम करण्यात येत असून बँकेत तिच्या नावाने रक्कम ठेवली जाणार आहे. या रकमेतून तिचे शिक्षण केले जाणार आहे. नकोशा झालेल्या मुलीला कचºयात फेकून जन्मदाती महिलेने गुन्हा केला असला तरी अशा प्रकारच्या गुन्ह्याची पहिल्यांदाच पोलीस खात्याच्या इतिहासात नोंद झाली आहे. मुलीचा सांभाळ करण्यासाठी तयार झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक सुधीर कुडाळकर व एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यातील प्रत्येकाला पीटीआय टाईम्सचा मानाचा सलाम!

 

↓↓↓ ही बातमीही आवश्य वाचा  ↓↓↓

माटुंगा पोलीस ठाण्याच्या खाकीतील देवदूतांना सलाम

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.