Karsandas Natha Trust Bhatia Building | पोलिसांना १८ वर्षे सेवा देणा-या संस्थेचे कौतुकास्पद कार्य
कर्सनदास नाथा ट्रस्ट भाटीया बिल्डिंगच्या सभासदांना सलाम

मुंबई : पोलीस दिवस-रात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क असतात. सण-उत्सवात तर पोलिसांची आणखीन जबाबदारी वाढते. याचे उदाहरण म्हणजे राज्यातील सर्वांचा प्रिय गणेशोत्सव! गणपतीबाप्पाच्या विसर्जनावेळी २४ तास कर्तव्य बजावताना पोलीस बांधव-भगिणी सर्वांच्या नजरेस पडतात. पोलिसांची कर्तव्यदक्षता लक्षात घेऊ न कर्सनदास नाथा ट्रस्ट भाटीया बिल्डिंगचे रहिवासी व ट्रस्ट मदतीसाठी सरसावली. बंदोबस्तावर तैनात असल्याने वेळेवर जेवण करता येत नाही. हीच बाब लक्षात घेत गेल्या १८ वर्षांपपासून विसर्जनाच्या दिनी पोलिसांसाठी खास पौष्टीक जेवण व चहापाण्याची सोय ही संस्था करत असते. या कौतुकास्पद कार्याचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
प्रार्थना समाज हॉलमध्ये उत्तम नियोजन
अनंतचतुर्दशीच्या दिनी दिवसभर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी दुपारी व रात्रीच्या जेवणाचे व्ही. पी. रोड येथील राजाराम मोहन रॉय मार्गावर असलेल्या प्रार्थना समाज हॉलमध्ये उत्तमरित्या नियोजन करण्यात आले होते. तसेच चहा व बिस्कीटांची सोय करण्यात आली होती. या सेवेचा पोलीस, होमागार्ड यांनी लाभ घेतला आणि या संस्थेने जपलेल्या माणुसकीचे कौतुक केले.


Keep up the spirit.