Karnataka woman jailed for stealing in Mumbai | मुंबईत चोºया करण्यासाठी येणारी कर्नाटकची महिला जेरबंद
ठाण्यातील ३ गुन्ह्यांची उकल

ठाणे : मुंबईत चोºया करण्यासाठी येणाºया कर्नाटक राज्यातील एका सराईत आरोपी महिलेला जेरबंद करण्यात आले आहे. सदर कारवाई लोहमार्ग गुन्हे शाखेच्या ठाणे पथकाने केली. या महिलेच्या अटकेमुळे ३ गुन्ह्यांची उकल झाली आहे. ही महिला सध्या पोलीस कोठडीत असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
एका गुन्ह्याच्या तपासात तीन गुन्हे उघड
ठाणे रेल्वे स्थानकातून रचना पडवेकर या अंबरनाथ फास्ट ट्रेनमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील चेन चोरीला गेली. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. ६०४/२०२२) भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच प्रकारे अन्य दोन महिलांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यामुळे महिलांचा ऐवज लुटणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त करून आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिल्या. त्यानुसार ठाणे गुन्हे शाखेचे पथक तपास करू लागले. तपासादरम्यान कर्नाटकातून एक महिला चोºया करण्यासाठी मुंबईत आल्याची माहिती खबºयाने पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सापळा लावून महिला आरोपीला ताब्यात घेतले.
कर्नाटकमधून यायची लुटण्यासाठी…
आरोपी महिलेचे नाव मुस्कान रफीक शेख ऊ र्फ (वय २८) असे महिलेचे नाव असून ती कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे राहते. ती मुंबईत चोºया करण्यासााठी यायची. अशाच प्रकारे तिने ३ गुन्हे केल्याचे उघडकीस आल्याने ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
यांनी केला गुन्ह्याचा तपास
सदर कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद, पश्चिम लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर, सपोउपनि गजानन शेडके, हवालदार संदीप गायकवाड, अतुल साळवी, अतुल धावडे, वैभव शिंदे, रवींद्र दरेकर, पोना अमित बडेकर, अनिल खाडे, सतीश धायगुडे, गणेश माने, शशिकांत कुंभार, इमरान शेख, अंमलदार हरिष संदाशिव, सुनील मागाडे, महिला हवालदार वृषाली मयेकर, सपना शिंदे, रजनी सानप, सोनाली पाटील, यांनी केली.
ही बातमी वाचा…