juhu police station | सराईत सोनसाखळी चोरांना धाडले तुरुंगात
जुहू पोलिसांची उत्कृष्ट कारवाई

मुंबई : सोनसाखळी, मंगळसूत्र चोरणाºया दोन सराईत चोरांना तुरुंगात धाडण्यात आले आहे. ही उत्कृष्ट कारवाई मुंबई पोलीस दलाच्या जुहू पोलिसांनी केली. या कारवाईमुळे २ गुन्ह्यांची उकल झाली असून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व पळवलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.
जुहू परिसरात राहणारी महिला १७ जानेवारी रोजी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास दूध आणण्यासाठी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून सुसाट निघून गेले. या प्रसंगातून स्वत:ला सावरत महिलेने पोलीस ठाणे गाठले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध (गु. र. क्र. २२/२३) भादंवि कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे पथक करू लागले. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे नालासोपारा परिसरातून आरोपी सुनील सकपाळ ऊ र्फ भाई (३९) व सुरेश निषाद ऊ र्फ सुºया (२९) याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईदरम्यान महिलेचे पळवलेले ४० हजारांचे मणीमंगळसूत्र व १ लाख रुपयांची बाईक पोलिसांनी जप्त केली. या आरोपींच्या अटकेमुळे विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची उकल झाली आहे.
दोन्ही आरोपी पोलीस रेकॉर्डवरील…
आरोपी सुनील आणि सुरेश हे दोघेही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सुनील विरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये ४० हून अधिक तर सुरेश याच्यावर १० हून अधिक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती तपासादरम्यान उजेडात आली आहे. दोघांनाही न्यायालयाने २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तपास करणाºया पोलिसांनी वर्तवली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई परिमंडळ ९ चे उपायुक्त अनिल पारस्कर, सांताक्रूझ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयप्रकाश भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजितकुमार वर्तक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी सपोनि विजय धोत्रे, पोउपनि अभिषेक पाटील, हवालदार तोडणकर, गजानन पाटील, अतिश पाटील, पोलीस नाईक खोमणे, महांगडे, मांडेकर, रत्नाकर पाटील, हंचनाळे, अंमलदार भोसले, तायडे, तासगावकर यांनी केली.