क्राईम न्यूज

Juhu police arrested two accused | मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी दिवसाढवळ्या चो-या करणा-यांना ठोकल्या बेड्या

जुहू पोलीस ठाण्याचे सपोनि विजय धोत्रे व गुन्हे प्रकटीकरण पथकाची कौतुकास्पद कारवाई

मुंबई : मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी दिवसाढवळ्या जबरी चोºया करणाºया दोन सराईत आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कौतुकास्पद कारवाई जुहू पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धोत्रे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या कारवाईमुळे पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे. या आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भरस्त्यात रिक्षातून आलेल्या चोरांनी मोबाईल पळवला

१४ एप्रिल २०२२ रोजी जुहू परिसरातील स्टारबक्स दुकानासमोारून एक व्यक्ती चालत जात होता. त्यावेळी रिक्षातून आलेल्या चौघांनी त्या व्यक्तीला अडवले. धक्काबुक्की करत बळजबरीने त्या व्यक्तीकडील मोबाईल खेचून लुटारूंनी पळ काढला. या प्रकरणी जुहू पोलिसांनी (गु.र.क्र. 360/2022) भादंवि कलम 392, 34 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास जुहू पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक करू लागले. तपासादरम्यान पोलिसांना आरोपींची माहिती प्राप्त होताच सापळा लावून राम राजकुमार तिवारी उर्फ बन्ना (वय 26, धंदा रिक्षाचालक, रा, ठि. जय अंबिका हील, रूम नंबर 3, सुंदर बाग कुर्ला-कमानी समोर, घाटकोपर पश्चिम मुंबई), आकाश अभिराज प्रजापति (24, रा. कुर्ला-कमानी सुंदर बाग घाटकोपर) यांच्या मुसक्या आवळल्या.

 

अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत असून ते रिक्षातून यायचे. रस्त्याने एकट्या जाणाºया वयोवृद्ध, जेष्ठांना खास करून टार्गेट करायचे. त्यांच्याकडून बळजबरीने मोबाईल हिसकावून पळ काढायचे. अशा प्रकारे या आरोपींनी एमआयडीसी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, सायन, पंतनगर, वाकोला पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोºया केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.

या पाच गुन्ह्यांची झाली उकल

1 जुहू पोलीस ठाणे (गु.र.क्र. 360/2022 कलम 392, 34)

2 टिळक नगर पोलीस ठाणे (गु.र.क्र. 223 /22 भादंवि कलम 379)

3 पवई पोलीस ठाणे (गु.र.क्र.491/22 भादंवि कलम 379), (गु.र.क्र.492/22क.379 भा. द.वि)

4 व्ही बी नगर पोलीस स्टेशन (गु.र.क्र. 295/22 भादंवि कलम 379)

जुहू पोलीस ठाण्याचे पथक

या गुन्ह्याची उकल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित कुमार वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धोत्रे, हवालदार तोडणकर, पोलीस नाईक पाटील, पोलीस नाईक महांगडे, पोलीस नाईक मांडेकर, पोलीस अंमलदार टोकरे, पोलीस अंमलदार भोसले, पोलीस अंमलदार कनमुसे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.