jewellery chori news in marathi | एक्सप्रेस, मेलमध्ये १३ महिलांचे दागिने चोरी
सराईत आरोपीला अटक, २१ लाख ६८ हजारांचे सोने जप्त

कल्याण : लांब पल्ल्याच्या मेल, एक्सप्रेसमध्ये १३ महिलांचे दागिने चोरणाºया एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली. या कारवाईत २१ लाख ६८ हजार ४०० रुपयांचे ४१७.३५ ग्रॅम वजनांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती लोहमार्ग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अरशुद्दीन शेख यांनी दिली.
अशा प्रकारे
पळवायचा दागिने
मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन म्हणून कल्याण या स्थानकाची ओळख आहे. या स्थानकात महाराष्ट्राबाहेर आणि राज्यातील ठिकठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये जाणाºया सर्वच गाड्यांना थांबा आहे. त्यामुळे या स्थानकामध्ये दिवस-रात्र गर्दी असते. याच गर्दीचा फायदा भुरटे चोरटे घेत होते. हे चोर वारंवार चोºया करू लागल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली. नेहमीच होणाºया चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या सूचना मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिल्या. त्यानुसार कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेऊ लागले.
अजमेरमधून दागिने
सोन्याची लगड जप्त
गुन्हे शाखेचे पोलीस पथक आरोपीचा शोध घेऊ लागले. तपासादरम्यान कल्याण स्थानकात फलाट क्रमांक ४ व ५ वर आलेल्या एक्सप्रेसमध्ये चढणाºया गर्दीतील एका इसमावर संशय आला. त्याच्या संशयास्पद हालचालींवरू पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव शहजाद कल्लन सय्यद (२८, रा. पत्री पूल, कल्याण, मूळचा रा. राजस्थान) असे सांगितले. तसेच त्यांनी आतापर्यंत चोरी केलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना दिली. या गुन्ह्यांमध्ये चोरलेला सोन्याचा ऐवज अजमेर येथे एका सोनाराला विकल्याची कबुली सय्यद याने दिली. त्यानुसार कल्याण गुन्हे शाखेचे पथक कल्याण येथे रवाना झाले. या पथकाने अजमेरमधील जुल्फिकारअली ऊ र्फ गुड्डू याची चौकशी केली असता त्याने विकत घेतलेले चोरीचे दागिने वितळवल्याचे सांगितले. या तपासात पोलिसांनी त्याच्याकडून १३ सोन्याच्या लगड जप्त केल्या.
लोहमार्ग गुन्हे शाखेचे ‘बेस्ट’ पथक
या गुन्ह्यांचा उलगडा मध्य लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, हवालदार राजेंद्र दिवटे, जनार्दन पुलेकर, रणजित रासकर, शंकर परदेशी, रवींद्र दरेकर, स्मिता वसावे, पद्मा केंजळे, महेंद्र कर्डिले, रवींद्र ठाकूर, कुणाल तावडे, अजित माने, सोनाली पाटील, अंमलदार गोरख, सुरवसे, अक्षय चव्हाण, सुनील महागाडे यांनी केली.
ही बातमीही वाचा