देश विदेशमहाराष्ट्रसंपादकीय व लेख

IPS Mahesh Bhagwat who made the name of Maharashtra famous in Telangana | महाराष्ट्राचे नाव तेलंगणात गाजवणारे आयपीएस महेश भागवत

मराठी माणसाने घडविला इतिहास

मुंबई : प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करून मराठी माणसाने इतिहास घडविला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्याची ओळख सातासमुद्रापार आहे. दक्षिण महाराष्ट्रात जन्माला आलेले महेश भागवत हे १९९५ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भारतीय पोलीस सेवेत कर्तव्य बजावू लागले. मूळचे अहमदनगरमधील पाथर्डी येथील असलेल्या महेश भागवत यांचे आईवडील शिक्षक होते. पाथर्डीच्या विद्या मंदिरात शिक्षण घेतलेल्या भागवत यांनी पुण्यामध्ये सिव्हील इंजिनीअरिंग पूर्ण केले आहे. सध्या आंध्र प्रदेश आणि तेलंगाणातील अनेक अधिका‍ºयांचे आयडॉल ठरलेले मराठमोळे भागवत यांच्या कर्तव्याचा मागोवा पीटीआय टाईम्सच्या टीमने घेतला आहे.

रचाकोंडा विभागाचे
पोलीस आयुक्त

ips mahesh bhagwat
ips mahesh bhagwat

खाकीतला माणूस जेव्हा सामान्य माणसाच्या भल्यासाठी अहोरात्र एक करतो. तेव्हाच पोलीस यंत्रणेवरचा विश्‍वास दृढ होतो. खाकी परिधान करूनही एखादा माणूस सर्वसामान्य माणसात मिसळून काय करू शकतो हे पाहायचे झाल्यास रचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांचे उदाहरण योग्य ठरेल. हैदराबादच्या जवळच असलेल्या तीन पोलीस आयुक्तालयांमध्ये रचाकोंडाचा समावेश झाला आहे. महेश भागवत हे तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व रचाकोंडा विभागाचे पोलीस आयुक्तपदी कर्तव्य बजावत आहेत. मराठी माणसाला अभिमान वाटावा, असे उल्लेखनीय कार्य महेश भागवत यांनी आजवर केले आहे.

कोरोना संकट काळात
जपली माणुसकी

२०२० साली अर्थात कोरोना संकट काळात लॉकडाऊन सुरू असताना महेश भागवत यांनी अनेक गरजूंना अन्नदानाचे पुण्यकर्म केले. तसेच कित्येक स्थलांतरित नागरिकांना मदत केली आहे. कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर देशभरात लॉकडाऊन होता. या काळात हातावर पोट भरणाºया मजुरांवर उपासमारीची वेळ आली. त्यावेळेस आयपीएस महेश भागवत हे दूत बनून या लोकांच्या मदतीला धावले. तेलंगाणातील ४१ वृद्धाश्रम भागवत यांनी दत्तक घेतले. तेथील एक हजार ६०० वृद्धांच्या जेवणाची सोयही त्यांनी केली. तसेच आधार नसलेल्या २० हजर आणि ४० हजार मजुरांच्या अन्नाची सोय त्यांनी केली. यासोबत या मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

अनेक आयपीएस
घडवण्यात मोलाचा वाटा

IPS Mahesh Bhagwat...
दिल्लीच्या अंकिता जैन आणि वैशाली जैन या दोघी बहिणी तिसरा आणि २१वा रँक पटकावला. या कामगिरीसाठी त्याचे आयपीएस महेश भागवत यांनी कौतुक केले
IPS Mahesh Bhagwat...
दिल्लीच्या अंकिता जैन आणि वैशाली जैन या दोघी बहिणी तिसरा आणि २१वा रँक पटकावला. या कामगिरीसाठी त्याचे आयपीएस महेश भागवत यांनी कौतुक केले

आयपीएस महेश भागवत यांनी कायम अनेकांचे करिअर घडवले आहे. त्यामुळे ते अनेकांसाठी रोलमॉडेल ठरले आहेत. नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात रचाकोंडा विभागाचे मराठमोळे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी मार्गदर्शन केलेले तब्बल १३१ उमेदवार चांगल्या रँकने उत्तीर्ण झाले. आयपीएस महेश भागवत हे मागील अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षा करणाºया विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना आयपीएस महेश भागवत हे मार्गदर्शन करतात. २०२० साली केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात ७६१ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. नियुक्ती झालेल्या उमेदवारांपैकी १३१ उमेदवारांना महेश भागवत यांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले आहे. त्यापैकी १९ उमेदवार हे १०० रँकच्या आत उत्तीर्ण झाले आहेत. महेश भागवत यांनी मार्गदर्शन केलेल्या दिल्लीतील दोन बहिणी अंकिता जैन आणि वैशाली जैन या दोघींनी अनुक्रमे तिसरा आणि २१वा रँक पटकावला तर आंध्र प्रदेशमधील दोन भावांनीही चांगली कामगिरी करून यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. दरम्यान, तेलंगाणा राज्यातून पहिली आलेली पी. श्रीजा हिलादेखील महेश भागवत यांनीच मार्गदर्शन केले आहे. श्रीजाला ही या परीक्षेत २० व्या रँक पटकावून उत्तीर्ण झाली आहे.

विनामूल्य विद्यार्थ्यांना
आयपीएस बनण्याचे धडे

IPS Mahesh Bhagwat .......
विनामूल्य विद्यार्थ्यांना आयपीएस बनण्याचे धडे

कर्तव्यापलीकडे जाऊन महेश भागवत हे प्रत्येक वर्षी विनामूल्य स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया उमेदवारांना लेखी परीक्षा, मुलाखतीसाठी मार्गदर्शन करतात. भागवत यांच्या या प्रयत्नांमुळे गेल्या सात वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया एक हजार उमेदवारांना मदत झाली आहे. स्पर्धक देशाच्या कानाकोपºयात राहत असल्याने त्यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून भागवत मार्गदर्शन करत आहेत. या ग्रुपमध्ये महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, राजस्थान, केरळ, आसाम, ओडिशा, मध्य प्रदेश, या राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे दरवर्षी स्पर्धा परिक्षांमधून उत्तम अधिकारी घडवणाºया व कर्नाटकात महाराष्ट्र राज्याची प्रतिमा आणखीनच उंचावणाºया आयपीएस महेश भागवत यांना पीटीआय टाईम्सचा सलाम!

 

ही बातमी वाचा…

पोलीस खात्याला लाभलेला अनोखा मित्र !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.