Insurance policy fraud in 11 states-इन्शुरन्स पॉलिसी, नोकरीच्या आमिषाने ११ राज्यात कोट्यवधीची फसवणूक
यूपीच्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात मुंबई सायबर गुन्हे प्रतिबंधक विभागाला यश

मुंबई : इन्शुरन्स पॉलिसीचे (Insurance policy fraud in 11 states ) व नोकरीचे आमिष दाखवून मुंबईसह ११ राज्यातील १४ जणांची फसवणूक करणा-या यूपीच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ही उल्लेखनीय कारवाई मुंबई पोलीस दलाच्या पूर्व प्रादेशिक सायबर गुन्हे प्रतिबंधक विभागाच्या (MUMBAI CYBER CRIME) (mumbai police cyber cell) पोलिसांनी केली. या कारवाईत विविध बँकाचे १८ डेबीटकार्ड, बँक पासबुक, विविध राज्यातील नागरिकांची फसवणूक करण्यासाठी ईमेल आय. डी., आधारकार्ड, आयकर विवरण व १२ मोबाईल, ३ थिंक पॅड, एक लॅपटॉप, एचपी कंपनीचा एक लॅपटॉप व रूपये ४४ हजार ४०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच तपासादरम्यान सदर आरोपींच्या बँक खात्यांमध्ये असलेली २० लाख ५० हजार फ्रीज केले आहे. या आरोपींनी आतापर्यंत अनेकांची कोट्यवधीची फसवणूक केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे.
मुंबईतील घाटकोपर परिसरातील ड्रायफुटच्या होलसेल व्यापा-याला ८ नोव्हेंबर २०२१ ते ४ आॅगस्ट २०२२ या कालावधीत वेगवेगळ्या अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन करून इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून त्याची पॉलिसी सरेंडर केल्यास ७ कोटी ७० लाख ९३ हजार २८ रुपये मिळण्याचे आमिष दाखवले. मुदतीपूर्वीच जादा रक्कम मिळत असल्याने व्यापारी भामट्यांच्या जाळ्यात अडकला. हे लक्षात येताच भामट्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रिसिप्ट, रिझर्व्ह बँकेचे पत्र, नॅशनल पेमेन्ट कार्पोरेशन आॅफ इंडीयाचे पत्र तसेच मिनीस्टर आॅफ फायनान्सचे सही शिक्याची बनावट कागदपत्रे ईमेलद्वारे व्यापाराला पाठवली. या बदल्यात व्यापाºयाकडून ४ कोटी ३९ लाख ५७ हजार ५३२ रुपये आॅनलाईन ट्रान्सफर करून घेतले. दरम्यान पैसे देऊनही पॉलिसीची रक्कम परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे व्यापा-याच्या लक्षात येताच त्याने तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात (गु. र. क्र . २०/२०२२) भादंवि कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), ५०६, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) नुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचे स्वरूप पाहता मोठे रॅकेट फसवणूक करण्यासाठी सक्रिय असल्याचा अंदाज वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी व्यक्त करून आरोपींना तात्काळ तुरुंगात धाडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पूर्व प्रादेशिक सायबर गुन्हे प्रतिबंधक विभागाचे पथक आरोपींचा शोध घेऊ लागले. तपासादरम्यान आरोपींनी व्यापाºयाची फसवणू करताना वापरलेल्या २७ विविध राज्यातील विविध बँकखात्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या बँकांपैकी हैदराबाद येथील बँकेतील खात्यातून ७१ लाख रूपये इंन्श्युरन्स पॉलिसीच्या मॅच्युरीटीच्या नावाखाली घेण्यात आल्याचे निष्पन्न होताच सर्वप्रथम पोलिसांनी आरोपी अनुजकुमार बालेश्वर सहा (वय २१ वर्ष, राहणार नोएडा, गौतमबुद्ध नगर, उत्तरप्रदेश) याला बेड्या ठोकल्या. आरोपी अनुजकुमार याचे मोबाईल शॉपीचे दुकान असून तो ा इंन्श्युरन्स पॉलिसीच्या नावाखाली फसवणुक करणाºया टोळीचा सदस्य झाला होता. त्याने अनेकांना फूस लावून लुटलेली रक्कम स्वत:च्या खात्यामध्ये घेवून तो नोएडा परिसरातील विविध बँकांचे एटीएमद्वारे विथड्रॉव्हल करून तसेच विविध बँकांमध्ये पैसे ट्रान्सफर केल्याचे निष्पन्न झाले. तसचे चौकशीदरम्यान त्याने साथीदाराची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी संदिप कुमार लालताप्रसाद (२८, रा. गाझियाबाद , उत्तरप्रदेश) याच्याही मुसक्या आवळल्या.
संदीपकुमार हा आरोपींना बँक खात्याची माहिती देत असे. त्याच खात्यांमध्ये आरोपी नागरिकांना पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत होते. या कामासाठी तो प्रत्येक बँकखात्यामागे १५ हजार रुपये घेत होता. बोगस बँक खाते तयार करण्यासाठी तो नागरिकांना लोन, नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आधार कार्ड, पानकार्ड व अन्य कागदपत्रे घेत असे. त्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून नवी मुंबई मोबाईली नंबर व अन्य कागदपत्रे तयार करत. त्या कागदपत्रांच्या आधाारे बँकेत खाते उघडत होता. अशा प्रकारे त्याने २५ बनावट बँकखाते उघडल्याचे निष्पन्न झाले.
या दोघांच्या चौकशीदरम्यान पोलिसांना कॉल सेंटर चालवणा-याची माहिती समजली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविकुमार सरोज सिंह (ग्रेटर नोएडा , उत्तर प्रदेश) याला अटक केली. त्याने सलारपूर, भंगेल, नोएडा, उत्तर प्रदेशात कॉल सेन्टर थाटले होते. कॉलसेन्टरमधून देशातील वेगवेगळ्या राज्यातील लोकांना कॉल करून त्यांना इन्श्युरन्स रक्कम मिळवून देण्याचे अमिष दाखवले जात होते. तसेच नोकरी देण्याचे अमिष दाखवून त्यांची लूट सुरू होती. या आरोपींन अशा प्रकारे अनेक नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून लुटल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त डॉ. बाळसिंग राजपूत (सायबर गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश नागवडे, प्रभारी पोलीस निरीक्षक एस . एस . सहस्त्रबुद्धे, पोलीस निरीक्षक जगन्नाथ मोरे, पो . नि . प्रकाश वारके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीनिवास कामुणी, पोलीस हवालदार राजेश पाटील, आकाश शिंदे, अंमलदार किसन राठोड, युवराज पाटील, प्रताप जाधव यांनी केली.