आरोग्य व शिक्षण

Historic Swap Kidney Transplant at Apollo Hospitals | अपोलो रुग्णालयात ऐतिहासिक स्वॅप मूत्रपिंड प्रत्यारोपण

नवी मुंबईत पहिल्यांदाच दोन कुटुंबियांनी एकमेकांच्या रुग्णांना केले मूत्रपिंडदान

नवी मुंबई : नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने पहिली स्वॅप मूत्रपिंड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. या स्वॅपमध्ये दोन कुटुंबाचा सहभाग होता, उरणमधील सीथा कुटुंबीय तर सायन (शीव)मधीन सैनी कुटुंब! वैद्यकीय गुंतागुंतींच्या अडचणींमुळे या कुटुंबांमधील सदस्यांना रुग्ण असलेल्या स्वत:च्या नातेवाईकांना मूत्रपिंड दान करता येत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी या दोन कुटुंबातील रुग्णांना एकमेकांचे मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले आणि राहुल सीथा यांच्या मातोश्री सुनंधा सीथा यांनी गुरुदेव सिंह यांच्या पत्नी परविंदर सिंह यांना मूत्रपिंड दान केले तर गुरुदेव सिंह यांनी राहुल सीथा यांना मूत्रपिंड दान केले.

याकरिता स्वॅप
प्रत्यारोपणाचा पर्याय

मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी शेवटचा टप्पा म्हणजे मूत्रपिंड प्रत्यारोपण ! या एकमेव उपचारात्मक पर्यायासाठी ज्यांना दाता मिळत नाही त्यांना डायलिसिसवर ठेवले जाते. स्वॅप प्रत्यारोपणामुळे दात्याची कमतरता कमी होण्यास मदत मिळते. स्वॅप प्रत्यारोपण करताना रक्तगट, एचएलए जुळत नसल्याने जे स्वत:च्याच कुटुंबातील सदस्यांना अवयव दान करु शकत नाही, अशांसाठी ही अवयवांची देवाणघेवाण असते. स्वॅप प्रत्यारोपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना अवयव दान करु इच्छितात मात्र विसंगतीमुळे अवयव दान करु शकत नाही. अशांसाठी दात्यांच्या समूहाचा विस्तार करुन अवयवदानाची असलेली तीव्र कमतरता दूर करते. अशाच प्रकारे सुनंधा सीथा (वय 49) यांना आपल्या मुलाला म्हणजे राहुल सीथाला (वय 28) मूत्रपिंड दान करायचे होते तर गुरुदेव सैनी (वय 64) यांना आपल्या पत्नी परविंदर सैनी (61 वर्षे) यांना मूत्रपिंड दान करायचे होते परंतु विसंगतीमुळे सुनंधा किंवा गुरुदेव या दोघांनाही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अवयव दान करता येत नव्हते. त्यासाठी स्वॅप प्रत्यारोपण् प्रणाली वापरण्यात आली.

या  सर्वांचा अभ्यास करूनच यशस्वीरित्या शस्त्रक्रिया

Swap Kidney Transplant in Apollo Hospitals
Swap Kidney Transplant in Apollo Hospitals

गुरुदेव सैनी यांचं रक्तगट होतं ए+ आणि त्यांच्या पत्नीचे एबी+. तिच्यामध्ये तिच्या पतीविरुद्ध दाता विशिष्ट प्रतिपिंड (डीएसए) चे उच्च अनुमाप होते आणि अस्वीकृतीची उच्च (30-40%) जोखीम होती. मुंबईत गेले 18 महिने एकही सुसंगत दाता सापडला नाही. त्याचप्रमाणे राहुल सीथा (ओ+) यांच्यामध्ये त्यांची आई सुनंधा (बी+) उच्च अनुमाप रक्तगटाचे प्रतिपिंड होते. म्हणजे अस्वीकृतीच्या जोखमीसह प्रत्यारोपणासाठी जास्त खर्च आणि उच्च प्रतिरक्षादमन अशी परिस्थिती होती. या स्वॅप प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत, दोन्ही प्राप्तकर्त्यांमध्ये डीएसएचे कमी अनुमाप दाखवले आणि यशस्वी होण्याची पातळी देखील उच्च होती, तसेच कमी क्षमतेच्या औषधांची गरज होती व संक्रमणाची शक्यता देखील कमी होती, या सर्वांचा अभ्यास करूनच यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाली, असे युरॉलॉजी सल्लागार, मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यविशारद रोबोटिक डॉ. अमोलकुमार पाटील म्हणाले.

अपोलोची ऐतिहासिक नोंद

या केसमधील दोन्ही रुग्ण एक वर्षाहून अधिक काळ मूत्रपिंडदात्याच्या प्रतिक्षेत होते. स्वॅप प्रत्यारोपणामुळे त्यांना सुसंगत दाता शोधण्यास मदत मिळाली. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सहकार्यामुळे आणि देवदूतरूपी डॉक्टरांवर दाखवलेल्या विश्वासामुळे नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात यशस्वीरित्या पहिले स्वॅप प्रत्यारोपण करण्यात आले. या ऐतिहासिक शस्त्रक्रियेमुळे या दोन्ही रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यामुळे नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समधील डॉक्टरांच्या टीमने आनंद व्यक्त केला असून अशाच प्रकारे विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी कायम सज्ज असल्याचे अपोलोचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष मराठे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.