Hats off to the duty of hawaldar Iqbal Shaikh / खाकीतले प्रशिक्षक इक्बाल शेख यांच्या कर्तव्याला सलाम
महाराष्ट्र पोलीस दलाचा गोल्ड मेडेलिस्टने दिले तंत्रज्ञानाचे धडे

मुंबई : महाराष्ट्र… या राज्यात प्रत्येक क्षेत्रात सुवर्ण इतिहास नोंदवला गेला. यात महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव अग्रस्थानी आहे. यासाठी अनेक पोलीस अधिकारी, अंमलदारांनी विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव जगभरात पोहोचले आहे. यासाठी हवालदार इक्बाल शेख (Hawaldar iqbal shaikh) यांनीही मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या आतापर्यंतची सुवर्ण कामगिरी लक्षात घेता त्यांना खंडाळा येथील प्रशिक्षण केंद्रात तंत्रज्ञानाचे धडे देण्याची संधी देण्यात आली.
सोलापूर ग्रामीणचे पोलिस हवालदार इक्बाल शेख यांना खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात मार्गदर्शन करण्याच्या सूचना महाराष्ट्र पोलीस राज्य मुख्यालयातून देण्यात आल्या. त्याुनसार त्यांनी ६ ते १८ मार्च दरम्यान प्रशिक्षण दिले. या विशेष प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षणार्थी, पोलिस अधिका-यांना शेख यांनी सीसीटीएनएस, गुन्हे व गुन्हेगारांचा शोध घेणे व गुन्हे प्रकटीकरणांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबात माहिती दिली. सदर मार्गदर्शन भविष्यात सर्व पोलीस अधिकारी, अंमलदारांना कर्तव्य बजावताना नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.
आतापर्यंत पटकावले १० सुवर्णपदक

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या सीसीटीएनएस विभागात कर्तव्यालाा असलेल्या इक्बाल शेख यांनी आजवर अनेक पोलीस स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव अव्वल स्थानी ठेवले आहे. या स्पर्धांमध्ये १० सुवर्ण, ७ रौप्य, ११कांस्य पदके, १ राष्ट्रीय पारितोषिक त्यांनी मिळवले आहेत. या एकूणच कर्तव्याचा आढावा घेत हवालदार इक्बाल शेख यांना २० प्रशस्तीपत्रे देऊ न सन्मानित करण्यात आले आहे. अशा या कर्तव्य दक्ष हवालदाराला पीटीआय टाईम्सचा सलाम!
यंदाचा मुलीचा वाढदिवस कायम स्मरणी राहणार…
प्रशिक्षण कालावधीदरम्यान १० मार्च रोजी त्यांची मुलगी आलीया हीचा वाढदिवस सर्व प्रशिक्षणार्थी, अधिकाºयांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामुळे मुलीचा यंदाचा वाढदिवस कायम स्मरणी राहिल, असे शेख कुटुंबियांनी सांगितले.