क्राईम न्यूज

Good Work Mumbai Police | पोलीस उपनिरीक्षक पिलाणी यांची कौतुकास्पद कामगिरी

आॅनलाईन वाईन आॅडर करताना भामट्याने पळवलेले ९६ हजार मिळवून दिले परत

मुंबई – बृहन्मुंबई पोलीस दल कायम नागरिकांच्या सेवेसाठी सतर्क असल्याचे आज १२ डिसेंबर २०२२ रोजी पुन्हा एकदा समोर आले. पवई पोलीस ठाण्यात कर्तव्याला असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सुधीर पिलाणे ( Sub Inspector of Police Sudhir Pilane) यांनी एका इसमाचे आॅनलाईन लुटण्यात आलेले ९८ हजार ९१५ रुपये त्याला परत मिळवून दिले. या कौतुकास्पद (Good Work Mumbai Police) कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी त्यांच्या कर्तव्याचे कौतुक केले.

असे भामट्याने आॅनलाईन पैसे पळवले…

पवई परिसरात ४५ वर्षीय सईद नावाची व्यक्ती राहते. त्यांना वाईन मागवायची होती. त्याकरिता सईदने वाईन विकणाºया नामांकित कंपनीचा नंबर गुगलवर सर्च केला असता सदर कंपनीच्या नावाचा एक नंबर त्यांना प्राप्त झाला. त्या नंबरवर त्यांनी फोन लावला. आॅनलाईन वाईनची आॅडर दिली. आॅडरची बुकिंगचे पैसे पेड करण्यासाठी फोनवर बोलणाºया भामट्याने लिंक पाठवली. सईदने विश्वासाने पेमेंट करण्यासाठी लिंकवर क्लिक केले आणि क्रेडिट कार्डची माहिती भरली. काही वेळात त्यांच्या कार्डमधील ९८ हजार ९१५ रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज सईदच्या मोबाईलवर आला. आॅनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सईन तात्काळ पवई पोलीस ठाण्यात दाखल झाला. एकूणच घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे प्रकटीकरण) गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुधीर पिलाणे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला. त्यांच्या कार्डामधील रक्कम आॅनलाई शॉपिंग करणाºया नामांकित कंपनीच्या अ‍ॅपद्वारे ट्रान्सफर झाल्याचे समोर आले. त्या माहितीच्या आधारे पिलाणे यांनी ताबडतोब कंपनीच्या नोडल अधिकाºयाशी संपर्क साधून ट्रान्झेक्शन थांबवण्यासाठी पाठपुरावा करतावच संपूर्ण रक्कम सईदच्या कार्डमध्ये पुन्हा जमा झाली.

इंटरनेटवर सर्च करताना सावध रहा…

बदलत्या काळानुसार चोरांनी / भामट्यांनीही आपला मार्ग बदलला आहे. पूर्वी बस, ट्रेनमध्ये व गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे खिसे कापून अथवा पाकीट पळवले जायचे. काळ बदलला आणि स्मार्ट फोन लोकांच्या हातात आला. त्यामुळे बँकिंग व्यवहारासह प्रत्येक क्षेत्रातील व्यवहार आॅनलाईन होऊ लागले. हीच बाब लक्षात घेत भामट्यांनी आॅनलाईन लुटण्यासाठी डाव साधला. याकरिता त्यांनी इंटरनेटवर जाळे पसरवले. कुठही माहिती हवी असल्यास प्रत्येक जण इंटरनेटवर सर्च करतो, हे लक्षात घेत बोगस वेबसाईटवर मोबाईल नंबर अपलोड केले आहेत. याच बोगस नंबरमुळे सईदने ९८ हजार ९१५ रुपये गमावले. मात्र पोलिसांच्या कर्तव्यतत्परतेमुळे ही रक्कम त्यांना पुन्हा मिळाली. त्यामुळे गुगलवर सर्च करताना सावधानता बाळगा. सर्च इंजिनवर प्राप्त नंबरची खात्री पटल्याशिावाय त्यावर आपली बँक खात्याची माहिती भरू नका अन्यथा आॅनलाईन लुटीच्या जाळ्यात अडकाल, हे कायम लक्षात ठेवा, असे आवाहन मुंबई पोलीस दलाकडून कायम केले जात असते.

police trust investigation

ही बातमी वाचा

मुंबईत हॉटेल बुक करताना पुण्याच्या मॅनेजरने गमावले २ लाख….

ही बातमीही वाचा

राजस्थानच्या महाराजाच्या नावाने फसवणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.