क्राईम न्यूज

Good action by Thane Crime Branch | गुन्हे शाखेच्या वपोनि दिलीप पाटील यांच्यामुळे एमडी तस्कर गजाआड

पिस्तूल, ९ काडतूस, ३ चॉपरसह ३.२१ लाखांचे एमडी जप्त

ठाणे : एमडी बाळगणा-या दोन तस्करांना मुंब्रा परिसरातील वाय जंक्शन येथे अटक करण्यात आली. ही कौतुकास्पद कारवाई ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखा घटक १ चे वपोनि दिलीप पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार करण्यात आली आहे. या कारवाईत तस्करांकडून पिस्तूल, ९ काडतूस, ३ चॉपर व ३ लाख २१ हजारांचे १०७ ग्रॅम एमडी असा एकूण ४ लाख २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठाणे जिल्हा अमलीपदार्थमुक्त राहण्यासाठी पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना, विविध पोलीस विभागांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने ठाणे गुन्हे शाखा घटक १ चे पथक तस्करांवर लक्ष ठेवून असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांना खबºयाने एमडी तस्करी करणाºयांची माहिती दिली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी २५ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंब्रा परिसरातील वाय जंक्शन येथे सापळा लावला. त्यावेळी तेथे आलेल्या अभिषेकुमार गुप्तेश्वर महतो(३२), विजय बहादूर मडे (२०) यांना ताब्यात घेतले. या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एमडी, पिस्तूल, ९ काडतूस, २ चॉपर आढळून आले. चौकशीदरम्यान आरोपी अभिषेकुमार महतो याच्या दिवा येथील राहत्या घरातून आणखी २ चॉपर जप्त करण्यात आले आहेत. या आरोपींनी सदर हत्यार कशासाठी आणले? कोणाकडून घेतले तसेच अमलीपदार्थ कोणाला विकणार होते ? या सर्वांचा तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखा घटक १ च्या पथकाने सांगितले.

एक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

या गुन्ह्याात अटक करण्यात आलेला अभिषेकुमार महतो हा सराईत गुन्हेगार आहे. एकावर जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी त्याला अटक झाली होती. या गुन्ह्यात अभिषेकुमार याला ८ वर्षांची शिक्षा झाली होती, असे तपासादरम्यान उघडकीस आले आहे.

कारवाई करणारे गुन्हे शाखा घटक १ चे कर्तव्यदक्ष पथक…

सदर कारवाई वपोनि दिलीप पाटील, पोनि कृष्णा कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश मोरे, संदीपप चव्हाण, पोउपनि दीपेश किणी, हवालदार विश्वास मोटे, हरिष तावडे, दीपक जाधव, नंदकुमार पाटील, अमोल देसाई, राजेंद्र सांबरे, बाळू मुकणे, अंमलदार सागर सुरळकर, समीर लाटे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.