ब्रेकिंगमहाराष्ट्र

Ganpati Bappa in khaki 2022 | खाकीतला गणपती बाप्पा

Lord Ganesha at Police Inspector Rajendra Kane's house | पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या घरी श्रींची प्रतिष्ठापना

मुंबई : पोलीस म्हटलं की कायदा-सुव्यवस्था, कर्तव्यनिष्ठपणा! त्यात सण-उत्सव असले की आणखीनच जबाबदारी वाढते. कोविड संकट काळानंतर यंदाच्या वर्षी थाटात-आनंदा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अशाच प्रकारे पोलिसांच्याही घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झाली. या पोलीस कुटुंबियांमध्ये गेल्या काही वर्षांपासून काणे कुटुंबियांचे नाव चर्चेत आले आहे. या कुटुंबियातील राजेंद्र काणे हे पोलीस निरीक्षकपदी मुंबई पोलीस दलात कर्तव्याला आहेत. त्यांनी खाकीतल्या बाप्पांची संकल्पना असतित्वात आणली आहे.

khakitil devdoot | खाकीतील देवदूत

कोणताही सणसुध किंवा सार्वजनिक उत्सवाचे दिन असल्यास पोलिसांची जबाबदारी आणखी वाढते. इतर वेळेच्या तुलनेत सर्वधर्मसमभाव कायम टिकवण्यासाठी पोलिसांची कसोटी लागते. त्यासाठी पोलिसांना प्रथम कर्तव्यासाठी घराबाहेर पडावे लागते. कुटुंबियातील पोलीस जेव्हा घराबाहेर असतो त्यावेळी त्याची कमतरता जाणवते. तसं पाहता पोलीस हे नागरिकांसाठी देवदुताच्या (khakitil devdoot) रूपातच असतात. संकटात नेहमी मदतीसाठी धावून जातात.

मुंबई पोलीस खात्याच्या
इतिहासात सुवर्ण नोंद

एकापेक्षा एक कर्तव्य दक्ष पोलिसांमुळे मुंबई पोलीस दलाचे नाव आजच्या घडीला सातासमुद्रापार गाजले आहे. पोलीस दलाच्या इतिहासात विलेपार्ले पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र काणे यांनीही सुवर्ण नोंद केली आहे. अनेक वर्षांपासून त्यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवात खाकीतला गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना केली जाते. खाकीच्या रूपात गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून राजेंद्र काणे यांनी मुंबई पोलीस खात्याच्या इतिहासात सुवर्ण नोंद केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.