Ganja smuggling going on in Thane district from Orissa | ओरिसावरून आणलेला ९० किलो गांजा जप्त
ठाणे अमलीपदार्थविरोधी पथकाची कारवाई

ठाणे : ओरिसावरून ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या गांजा तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. (Ganja smuggling going on in Thane district from orissa has been exposed.)ही उल्लेखनीय कारवाई ठाणे शहर पोलीस दलाच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने केली. या कारवाईत ९० किलो गांजासह १७ लाख ३६ लाख ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील तरुणाई व्यसनाची आहारी जात असताना या व्यसनाची तलफ आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागली आहे . सदर बाब लक्षात घेत पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी तस्करांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सर्वच पोलीस ठाणे व गुन्हे शाखेची पथके तस्करांवर लक्षा ठेवू लागले. पोलिसांची विशेष मोहीम सुरू असताना डोंबिवली पाईपलाईन-अंबरनाथ महामागांवरील धामटाण बस स्टॉपजवळ परराज्यातून गांजा आणला जाणार आहे , अशी माहिती खब-याने दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला . मिळालेल्या माहितीनुसार तेथे आलेली कार पोलिसांनी अडवली. कारची झडती घेतली असता त्यात पोते भरून गांजा आढळून आली. या प्रकरणी कारमधील रखी मुन्नालाल जैस्वाल, हसिन कयूम खान, रियाज सिद्धीकी यांना अटक केली. सदर कारवाईदरम्यान ९ लाख रुपयांचा गांजा, कार, मोबाईल, रोकड असा एकूण १७, ३६,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक दीपेश केणी करत आहात.
कारवाई करणारे ठाणे अंमलीपदार्थविरोधी पथक
ही कारवाई अमलीपदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पोनि गिरीष बने, पोउनि दीपेशा किणी, हवालदार तरडे, विक्रांत पालांडे, वासरवाड, हेमंत महाले, संदीप भांगरे, महेश साबळे, तडवी, महिला अंमलदार पादीर, चौधरी यांनी केली.
ही बातमी वाचा
आंध्र प्रदेशातील नक्षली भागातून ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या गांजा तस्करीची पोलखोल
सपोनि अविनाश महाजन यांची कौतुकास्पद कारवाई