Fraud in the name of world tour by advertising in newspaper | वृत्तपत्रात जाहिरात देऊन वर्ल्ड टूरच्या नावाने फसवणूक
पोनि भरत घोणे यांच्यामुळे एकाला अटक, अल्पवयीन मुलगा ताब्यात

मुंबई : गुजराती भाषिक वृत्तपत्रात वर्ल्ड टूरची जाहिरात (Fraud in the name of world tour by advertising in newspaper) देऊन नागरिकाची फसवणूक करणा-याला अटक केली असून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक भरत घोणे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे प्रकटीकरण (Mumbai Crime Branch) शाखा कक्ष ११ च्या पोलिसांनी शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मालवणी परिसरात केली. या आरोपींनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली असून त्यांना पुढील तपासासाठी कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्ल्ड टूरच्या विशेष पॅकेज ट्रीपची जाहिरात प्रसिद्ध झाली होती . सदर जाहिरात बोरिवलीत राहणा-या ज्येष्ठ नागरिकाने संपर्क साधला. दूरसाठी पैसे भरले. मात्र त्यांना पिकनिकला नेणे नाही. त्यांनी पुन्हा संपर्क साधला असता भामट्यांनी आणखी पैसे उकळले. फसवणूक झाल्याचे समजताच त्या नागरिकाने कस्तुरचा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. या गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेत गुन्ह शाख कक्ष ११ चे पोनि घोणे, सपोनि जाधव, अंमलदार पाटील, केणी, रावराणे, खताते, गोसावी हे आरोपाचा शोध घेऊ लागले. तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक भरत घोणे यांना आरोपींची माहिती खबºयाने दिली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाने मालवणी परिसरात सापळा लावून जिग्नेश मकवाना (४0) याला अटक करण्यात आली तर १७ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले.
ही बातमी वाचा
खाकीतल्या रक्तदात्याला सलाम