fake watch racket busted in mumbai | नागरिकांना बोगस घड्याळे विकणा-यांचा पर्दाफाश
Action taken against 5 persons selling bogus watches of reputed company | नामांकित कंपनीची बोगस घड्याळे विकणा-या ५ जणांवर कारवाई

मंबई – सध्या आॅनलाईनचे युग आले आहे. अनेकांच्या हाती मोबाईल आल्याने प्रत्येक जण स्मार्ट होत आहे. मात्र या स्मार्टनेस होणारे खरोखरच स्मार्टपणे वागतात? याचा प्रश्न मुंबई पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे नियंत्रण पथकाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला. सोशल मीडियावर जाहिराती करून ब्रँडेड घड्याळ्यांऐवजी बोगस घड्याळे विकली जात होती. सदर माहिती समजताच आर्थिक गुन्हे नियंत्रण पथकाच्या पोलिसांनी मुंबईतील नामांकित असलेल्या मनीष मार्केट आणि अल-सबा मार्केटमध्ये धाड टाकली. या कारवाईत ब्रँडेड कंपनीच्या नावाने बोगस घड्याळे विक्री सुरू होती.

Advertising for sale of watches on Facebook, Instagram | घड्याळ्यांची विक्रीसाठी फेसबुक, इन्स्टाग्रामवर जाहिराती
सध्या सोशल मीडियाला सर्व वयोगटातील नागरिकांची पसंती आहे. त्यामुळे प्रत्येक जण फेसबुक, इन्स्टाग्रामसह अन्य सोशल मीडियावर अॅक्टीव आहेत. याचा गैरफायदा घेऊ न भामट्यांनी सोशल मीडियावर जाहिरती केल्या. ब्रँडेड घड्याळे स्वस्त दरात विक्रीच्या जाहिराती झळकावल्या. या जाहिरातींची माहिती पडताच आर्थिक गुन्हे नियंत्रत्रण पथकाने कारवाईच्या अनुषंगाने तपास सुरू केला.

Action taken by Mumbai Police’s at Manish Market and Al-Saba Market | मनीष मार्केट आणि अल-सबा मार्केटमध्ये मुंबई पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे नियंत्रण कक्षाची कारवाई
तपासादरम्यान, पोलिसांनी फेसबुक, इन्स्टाग्रामवरील जाहिरातींची पडताळणी केली. त्यात ब्रँडेड घड्याळांच्या मूळ किमतीपेक्षा स्वस्त दरात घड्याळे मिळत असल्याचे निष्पन्न झाले. सदर बाब लक्षात घेऊ न पोलिसांनी कारवाईसाठी सापळा लावला आणि मनीष मार्केट आणि अल-सबा मार्केटमध्ये पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी तेथे मोठ्या ब्रँडेड कंपनीप्रमाणे दिसणारी हुबेहुब घड्याळे आढळून आली.

Watches worth more than Rs 1 crore seized | १ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे घड्याळे जप्त
1 या कारवाईत पोलिसांनी पोलिसांनी १ कोटी ६ लाख ७६ हजार ५०० रुपयांची २ हजार ८२ बोगस घड्याळे जप्त केली.
2 स्वस्त घड्याळ््यांच्या या जाहिरात सोशल मीडियावर पाहून अनेक जण या जाहिरातींना बळी पडले असतील, हे या कारवाईवरून स्पष्ट झाले.
3 या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. ४९/२०२२) कॉपीराईट अॅक्ट ५१, ५३ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी प्रवीणकुमार पटेल, शिवकुमार पुरोहित, अब्दुल हामिद शेख, जुनेद नूर इस्लाम शेख, शाहिद अली फ्यूझेल अहमद अंसारी यांना अटक करण्यात आली.

कारवाई करणारे पोलिसांचे पथक
बोगस घड्याळे विक्रीचा पर्दाफाश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, आर्थिक गुन्हेचे पोलीस सह आयुक्त प्रवीण पडवळ, गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्त महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे प्रकटीकरणचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष ब्यागेहळ्ळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपेश दरेकर, हवालदार महेंद्र जाधव, चंद्रकांत वलेकर, महेश नाईक, महेंद्र दरेकर, पोलीस नाईक शेखर भंडारी, संतोष पाटील, पोलीस अंमलदार नितीन मगर, भरत खारवी, रोहन शेंडगे, महिला पोलीस अंमलदार हिना राऊ त, संगिता पाटील यांनी केली.
What to look for when shopping online? | आॅनलाईन खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
बदल्या काळासोबत सर्व व्यवहार आॅनलाईन होत आहेत. धावत्या जगासोबत आपण सर्वांनी स्मार्ट होणे गरजेचे आहे. काही कालावधीत ५-जी येईल. त्यामुळे इंटरनेटचे जाळे अधिक प्रमाणात सहज उपलब्ध होईल. मात्र आॅनलाईन माध्यमांद्वारे खरेदी-विक्री करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सध्याच्या युगात अनेक वस्तू, बँकिंग व्यवहार आॅनलाईन होत आहेत. वस्तूंची खरेदी करताना अनेकदा मूळ किमतीपेक्षा विशेष सवलतीद्वारे कमी किमतीत विकली जाते. अशा वस्तू मुळात बोगसच असतात. त्यामुळे स्वस्त वस्तू खरेदीच्या मोहात पडू नये, असे आवाहन या कारवाईच्या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाकडून नागरिकांकडून करण्यात आले आहे.
ही बातमीही वाचा…
मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी दिवसाढवळ्या चो-या करणा-यांना ठोकल्या बेड्या
* Mumbai Railway Police | रेल्वे प्रवासात चोरीला गेलेल्या मोबाईलची परराज्यात विक्री