Drug smuggler arrested in Mumbai | Mephedrone | मुंबईत ड्रग्ज तस्कराला अटक
२३ लाखांचे एमडी जप्त

मुंबई : वेसनाच्या आहारी जाऊन ड्रग्ज तस्करीकडे वळलेल्या २३ वर्षीय झाहीद याला अटक केली आहे. सदर कारवाई आझाद मैदान अमलीपदार्थविरोधी पथकाने केली . या कारवाईत २३ लाख रुपयांचे ११५ ग्रॅम एमडी ( मेफेड्रॉन ) Mephedrone जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुंबईत वाढणारे अमलीपदार्थ तस्करीचे जाळे तोडण्याकरिता अमलीपदार्थविरोधी विभागाचे उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून आझाद मैदान अमलीपदार्थविरोधी पथकाचे प्रभारी राजेंद्र दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गस्त घालत होते. त्यावेळी मानखुर्द परिसरातील लल्लूभाई कंपाऊंड येथे एक तरुण संशयास्पदरित्या आढळून आला . पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एमडी आर्केळून आले. एमडी बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी झाहीद याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यानुसार पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ज्ञानेश्वर चव्हाण, उपायुक्त प्रकाश जाधव, आझाद मैदान अमलीपदार्थविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि पवळे, आवळे, हवालदार दोरगे, पाटील, अंमलदार कंराडे, मोरे, इघे, भोसले, सिंह, देशमुख, राठोड, निंबाळकर यांनी केली.
ही बातमीही वाचा