क्राईम न्यूजब्रेकिंगमहाराष्ट्र

Commendable action by Mumbai’s Juhu Police in Rajasthan’s Naxal areas | लग्नाचा आठ लाखांचा आहेर, लाखो रुपयांचे दागिने पळवणा-याला अटक

मुंबईच्या जुहू पोलिसांची राजस्थानच्या नक्षली भागात कौतुकास्पद कारवाई

मुंबई : लग्नात आलेला ८ लाखांचा आहेर व लाखो रुपयांचे दागिने पळवणाºया नोकराला अटक करण्यात आली आहे. ही कौतुकास्पद कारवाई मुंबईच्या जुहू पोलिसांनी राजस्थानच्या नक्षली भागात केली. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुंबईत आणल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपासाठी आरोपीला १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्ह्याचा घटनाक्रम…

प्लास्टिकच्या वस्तू बनवणारे प्रथम गांधी हे व्यावसायिक जुहू परिसरात कुटुंबियांसह राहतात. त्यांचे मार्च २०२२ महिन्यात विवाह झाला होता. घरातील सर्व जण चकाला येथील स्वत:च्या कार्यालयात सकाळीच जात. त्यावेळी त्यांचे आजी-आजोबाा घरात एकटेच राहायचे. त्यांच्या देखभालीसाठी तसेच घरकामासाठी नोकराची नियुक्ती करण्याचे गांधी कुटुंबियांनी ठरवले. त्यानुसार टिपू लाल बाबूजी मीना (वय ३५) याला कामासाठी नियुक्त करण्यात आले. टिपूला कामासाठी ठेवल्याने गांधी कुटुंबिय निश्ंिचतपणे आपापल्या कामासाठी घरबाहेर पडत होते. रोजचा दिनक्रम सुरू असताना टिपूची नियत फिरली. त्याने १६ सप्टेंबर रोजी बेडरूममधील लाकडी कपाटाच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले ८ लाख रुपये, १ लाख ८५ हजारांचे दागिने चोरून पळ काढला. दरम्यान २१ सप्टेंबर रोजी लग्नात आलेला ८ लाख रुपयांचा रोख आहेर बँकेत जमा करण्यासाठी ड्राव्हरमधील पैसे घेण्यास प्रथम यांची पत्नी गेली असता चोरी झाल्याचे उघडकीस आले.

तांत्रिक माहितीच्या आधारे
गुन्ह्याची उकल

juhu police
अटक आरोपी व जप्त मुद्देमालाची माहिती देताना जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व तपास करणारे पोलीस

घरातील दागिने, रोकड चोरीला गेल्याने गांधी कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली. घरात चोरी झाल्याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी (गु. र. क्र. १०१८ /२०२२) भादंवि कलम ३८१ नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे पथक करू लागले. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करताना आरोपी टिपूची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे तपास करणारे पोलीस राजस्थानला रवाना झाले. तेथील धरियाव येथील नक्षली भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्या राहत्यातून ४ लाखांची रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांच्या कारवाईला सलाम!

या गुन्ह्याचा तपास परिमंडळ ९ चे उपायुक्त मजुंनाथ सिंगे, सहाय्यक पोलीस आयुक्त जयप्रकाश भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजीतकुमार वर्तक, पोलीस निरीक्षक अशोक मोरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धोत्रे, पोलीस नाईक अमित महांगडे, अंमलदार सुहास भोसले यांनी केला. या कारवाईकरिता पीटीआय टाईम्सचा तपासी पथकाला सलाम!

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.