Blood donation in Dombivli | २३५ डोंबिवलीकरांनी जपली सामाजिक बांधिलकी
व्ही सर्व्ह ह्युमिनिटीचे रक्तदान शिबीर संपन्न

डोंबिवली : सालाबादप्रमाणे याही वर्षी डोंबिवली पश्चिम येथील जय हिंद कॉलनीतल्या डॉन बॉस्को शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, २६ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २३५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान करणाºया प्रत्येकाला व्ही सर्व्ह ह्युमिनिटी या ग्रुपने प्रशस्तीपत्र व तुळशी रोप देऊ न आभार मानले. सदर शिबिरासाठी केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीचे मोलाचे सहकार्य लाभले.
डॉन बॉस्को शाळेच्या विद्यार्थ्यांची जनजागृती
कोविड काळानंतर व्ही सर्व्ह ह्युमिनिटी व डॉन बॉस्को शाळा प्रशासनाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. हे रक्तदान शिबिराची डोंबिवलीतील नागरिकांपर्यंत माहिती विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली होती. यावेळी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, असे ब्रीद नारिकांपर्यंत पोहवण्यात आले. हे शिबीर यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी व्ही सर्व्ह ह्युमिनिटी ग्रुपमधील प्रत्येक सभासद, शाळेतील शिक्षकवर्ग व शाळेच्या मुख्य प्रेवशद्वाराजवळ कायम सतर्क राहून विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याची महत्त्वाची भूमिका बजावणाºया सुरक्षारक्षकांचे मोलाचे योगदान लाभले.
डोंबिवलीकरांचे आभार….
रक्तदान करून माणुसकी जपणाºया प्रत्येकाचे मनापासून आभार मानत पुढच्या वर्षी पुन्हा अशा प्रकारे रक्तदान करून आणखी नागरिकांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करा, असा आभार संदेश देऊ न व्ही सर्व्ह ह्युमिनिटी ग्रुपने डोंबिवलीकरांचे आभार मानले.