क्राईम न्यूजमहाराष्ट्र

bharati vidyapeeth Police | पत्नीवर वाईट नजर ठेवणा-या मेहुण्याचा खून

Murder of a brother-in-law in pune | ४८ तासात आरोपी तुरुंगात, भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

पुणे – पत्नीवर वाईट नजर ठेवणाºया मेहुण्याचा खून करणाºयांना अटक करण्यात आली आहे. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या ४८ तासांत या गुन्ह्याची उकल करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे.

दहीहंडीच्या दिनी इसमाचा खून

दही हंडीचे दिवशी भारती विदयापीठ पोलीसांना दरीपुलाचे खाली पिलर लगत एका अनोळखी इसमाचा मृतदेह जखमी अवस्थेत मिळला होता. सदर अनोळखी इसमाचे बाबतीत काही एक माहीती मिळून येत नसल्याने तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी सदर अनोळखी मृतदेहाचा फोटो व त्याचे वर्णन व्हॉटसअ‍ॅपवर वायरल केले. सदरची माहीती पोलीस ग्रुप व परिचयाचे ग्रुपवर त्यांनी प्रसारीत केली. दरम्यान या मृताचे २० आॅगस्ट रोजी ससून हॉस्पिटल येथे पोस्टमार्टम झाले. पोलीस ठाण्याचे अंमलदार धनाजी पोपट धोत्रे यांनी अज्ञात इसमाचे विरुद्ध फिर्याद दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (गु.र.नं. ५४३/२०२२) भादंवि कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा नोंद केला आहे. २१ आॅगस्ट २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजण्याचे सुमारास व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर प्रसारीत केलेली माहिती पाहून मयताचा भाऊ विजय गणपती दुपारगुडे (रा. म्हाळुंगे पुणे) हे पोलीस ठाण्यात येथे आले. अनोळखी मयत इसम हा त्यांचा धाकटा भाऊ महादेव गणपती दुपारघुडे असे असल्याचे सांगितले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर व पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी तपास पथकाच्या तीन टीम तयार करुन वेगवेगळया भागात पाठवून दिल्या.

अशा प्रकारे आरोपी लागले हाती

तपास पथकाचे अधिकारी नितीन शिंदे, पोलीस कमर्चारी आशिष गायकवाड, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी व रविंद्र चिप्पा यांनी गोपनीय बातमी व तांत्रिक विश्लेषणच्या आधारे इसम नामे तुषार दिलीप मेटकरी (रा . केशव नगर मुंढवा, पुणे) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने सांगितले की, मयत इसम महादेव दुपारगुडे हा नात्याने चुलत मेहुणा लागत असून, तो माझी पत्नीवर वाईट नजर ठेऊन होता, तिला वांरवार त्रास देण्यासाठी अश्लिल बोलत होता. त्याला अनेकदा समजावले मात्र त्याचे चाळे सुरूच होते. त्यामुळे त्याचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निश्चय केला. त्यासाठी १९ आॅगस्ट रोजी दहीहंडीचे दिवशी फोन करून त्यास पत्नीचे घरी वडगाव धायरी येथे नेले व समजाऊन सांगितले. परंतु तो ऐकत नसल्याने त्यास मी व माझे दोन मेहुणे विनोद दुपारगुडे, किरण चौधरी व पत्नी आशाने त्यास मारहाण केली व रिक्षाने जांभुळवाडी दरीपुलाचे खाली ठेऊन निघून गेल्याचे त्याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले.

यांना झाली अटक

पथकाचे कर्मचारी अवधुत जमदाडे, विक्रम सावंत व गणेश भोसले यांनी उर्वरित आरोपी विनोद दुपारगुडे व किरण चौधरी यांना वडगाव धायरी व नांदेड फाटा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनीच सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपी तुषार दिलीप मेटकरी (वय ३३ वर्षे, रा. स. नं. २९/१ केशव नगर, द्वारका पार्क, कोदरे कॉलनी, केआरबी वर्कशॉप पुणे), विनोद विष्णू दुपारगुडे (वय ३४ वर्षे, रा. गल्ली नंबर १४, गारमाळ , आंबेडकर नगर, वडगाव धायरी पुणे), किरण अंकुश चौधरी (वय ४३ वर्षे, रा. नांदेड फाटा, जाधव नगर, गोसावी वस्ती गणपती मंदीर जवळ, पुणे), आशा तुषार मेटकरी (वय ३२ वर्षे, रा. केशवनगर मुंढवा, पुणे) यांना गुन्हा घडल्यापासून अनोळखी मयत इसमाची ओळख पटवून ४८ तासांचे आत अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ करीत आहेत.

कारवाई करणारे पोलीस

सदर कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ ०२, पुणे शहर) सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिदे, धिरज गुप्ता, गौरव देव, अंकुश कर्चे पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, नरेंद्र महांगरे, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी , मितेश चोरमोले, विक्रम सावंत, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, राहुल तांबे, अभिजित जाधव, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, तुळशीराम टेभुर्णे, रविंद्र भोरडे व राहुल शेडगे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.