क्राईम न्यूजमेट्रो सिटी न्यूज

best detection mumbai police | दिवसाढवळ्यात घरातून 3 मोबाईलसह लिनोव्हा टॅब चोरणा-याला अटक

Bhandup police | 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत; भांडुप गुन्हे प्रकटीकरण पथकाची उत्तम कारवाई

मुंबई : दिवसाढवळ्या घरातून ३ मोबाईल व लिनोव्हा कंपनीचा टॅब चोरी करणा-याला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई मुंबई पोलीस दलाच्या भांडुप पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या कारवाईत ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

असा पळवला मुद्देमाल

भांडुप पश्चिम परिसरात राहणारे फिर्यादी हे शौचालयाला गेले होते. त्यावेळी त्यांनी घराचे मुख्य द्वार ओढून घेतले. काही वेळानंतर ते परत आले असता त्यांच्या बेडरुममधील बेडवर ठेवलेले मोबाईल, लिनोवा टॅब असा ४० हजारांचा मुद्देमाल निदर्शनास पडला नाही. सदर मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध (गु. र. क्र. ५००/२०२२) भांदवि कलम ३८०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.

ठाणे-शिळफाटा मार्गावर
आरोपीला ठोकल्या बेड्या

दिवसाढवळ्या भांडुप परिसरात चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सूचाना वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरणचे पथक आरोपींचा शोध घेऊ लागले. तपासादरम्यान माहिती प्राप्त होताच पोलिसांनी ठाणे-शिळ मार्गावर सापळा लावून आरोपी शादाब उमर सिद्दीक (वय 32) याला अटक केली. आरोपी हा चोरी करण्यासाठी रेकी करायचा. बंद घरांवर, दरवाजा उघडा असल्यास संधी साधायचा. अशा प्रकारे त्याने आणखी गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.

कारवाई करणारे भांडुप पोलीस

सदर कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेखा कपिले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन उन्हवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल डमरे, सपोउपनि पवार, पोना लुंबाळ, पाटील, अंमलदार राठोड यांनी केली.

ही बातमी वाचा…

अंडरवर्ल्डच्या टोळी युद्धाच्या आठवणी पुन्हा आल्या चर्चेत

दाऊदच्या शूटरला गोळ्या घालणा-या छोटा राजनच्या गुंडाला पुन्हा ठोकल्या बेड्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.