Best Detection Mumbai Crime Branch | मुंबई, ठाण्यात मोटारसायकल चोरणाºया दोघांना अटक
मुंबई पोलीस दलाच्या युनिट ७ च्या कारवाईमुळे ३ गुन्ह्यांची उकल

मुंबई : मुंबई व ठाण्यात मोटारसायकल चोरणाºया दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कौतुकास्पद कारवाई मुंबई पोलीस दलाच्या युनिट ७ च्या पथकाने केली. या कारवाईमुळे मुंबईतील २ तर ठाण्यातील एका गुन्ह्याची उकल झाली असून २ लाख ६० हजार रुपयांच्या तीन मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पोलीस हवालदार मोरे
यांची उत्तम कामगिरी
गेल्या काही दिवसांपासून मुंबई व ठाण्यात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पोलिसांसह स्थानिक पोलीस आरोपींचा शोध घेऊ लागले. कारवाई सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ७ च्या पथकातील हवालदार मोरे यांना मोटारसायकल चोरांची माहिती खबºयाने दिली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी भांडुप येथे सापळा लावून आरोपी अदनान अश्मत खान (21), नूर समशेर सय्यद उर्फ सुलतान (वय 18 वर्ष 7 महिने) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलबाबत चौकशी केली असता मुलुंड चेक नाका परिसरातून चोरल्याचे निष्पन्न झाले. तसेच चौकशीदरम्यान त्यांनी पवई, मुलुंड व ठाणे जिल्ह्यातील श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरल्याची कबुली या दोघांनी दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी पवई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे युनिट ७ ने सांगितले.
यांनी केली कारवाई
सदर कारवाई पोलीस सह आयुक्त (गुन्हे) सुहास वारके, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) वीरेश प्रभू, पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रिया थोरात पोलीस निरीक्षक सुधीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोघ सिद्ध ओलेकर, पोलीस उपनिरीक्षक माधवानंद धोत्रे, रामदास कदम, स्वप्निल काळे, महेश शेलार, नामदेव परबलकर, पोलीस हवालदार मोरे, पवार, सावंत, पोलीस नाईक जाधव, पांडे, सय्यद, शिरापुरी, चालक कदम यांनी केली.