क्राईम न्यूज

Bandra Railway Crime Branch | रेल्वे प्रवाशांना लुटणा-या सराईत आरोपीला अटक

७ गुन्ह्यांची उकल; १.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी संधी साधत प्रवाशांचे मोबाईल, लॅपटॉप बॅगेसह पळवणा-या सराईत गुन्हेगाराला अक करण्यात आली आहे. हा आरोपी हाती लागल्याने चचर्गेट लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ७ गुन्ह्यांची उकल झाली असून १ लाख ९६ हजार ४९० रुपयांचे ४ लॅपटॉप, मोबाईल जप्त केले आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वे प्रवासात अनेक महामुंबईकरांनी किमती मुद्देमाल गमावला आहे. याला आळा घालण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी चोरांना तुरुंगात धाडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वपोनि अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलिसांनी तपासासाठी विशेष मोहीम सुरू केली. या मोहिमेंतर्गत वांद्रे लोहमार्ग शाखा ६ चे पथक गर्दीच्या वेळी चोरांवर लक्ष ठेवू लागले. तपासादरम्यान तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता लोहमार्ग पोलिसांना आरोपी बाबूराम चौहान या आरोपीची माहिती समजली. त्या माहितीच्या आधारे तपासी पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. चौकशीदरम्यान चौहान याने २०२० सालापासून गेलेल्या ७ गुन्ह्यांची कबुली दिली.

कारवाई करणारे पथक…

सदर गुन्ह्याची उकल मध्य लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सचिन कदम, वपोनि अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन लोखंडे, अंमलदार महेश सुर्वे, गणेश क्षीरसागर, वैभव शिंदे, रविंद्रे दरकर, सिकंदर तडवी, महेश काळे, प्रशांत साळुंखे, मयुर भैये, सत्यजीत कांबळे, मयुर साळुंखे, अमरसिंग वळवी, सागर हिंगे, संदेश कोंडाळकर यांनी केली.

ही बातमीही वाचा

मुंबईत ड्रज तस्कराला अटक, २३ लाखांचे एमडी जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.