क्राईम न्यूज

Anniversary of Maharashtra Police Force | २०२३ ही कर्तव्यासाठी अर्पण… 

राज्य पोलीस दलाचा चोख बंदोबस्त

२०२२ वर्ष संपलं … २०२३ सालचे महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिकांनी उत्साहात स्वागत केले . नागरिकांचा उत्साहात साजरा होण्यासाठी राज्य पोलीस दलाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . रात्रभर पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावून नागरिकांच्या आनंदावर विरजन आणू दिले नाही . अशा प्रकारे गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा पोलीस दल कर्तव्यतत्परतेने कार्यरत आहेत . आज २ जानेवारी रोजी पोलीस दलाचा वर्धापन दिन (Anniversary of Maharashtra Police Force) आहे . या दिनाचे औचित्य साधत हे वर्षही कर्तव्यासाठी अर्पण करण्यात येईल . यात दुमत नाही . नववर्ष कर्तव्य बजावणारा प्रत्येक पोलिसाला व त्यांच्य कुटुंबियांना आनंदाचे जावो . जनतेच्या सुरक्षेसाठी त्यांना प्रचंड बळ मिळो , हीच सदिच्छा पीटीआय टाईम्सच्या परिवाराकडून व्यक्त करण्यात येत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.