क्राईम न्यूजमहाराष्ट्र

a man crushed to death with a stone because he was not given tobacco | तंबाखू दिली नाही म्हणून दगडाने ठेचून केला खून

Murder in Kolhapur | ऐन गणेशोत्सवात कोल्हापुरात धक्कादायक घटना

कोल्हापूर : खिशात तंबाखू असतानाही देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या दोघांनी एकाचा लाकडी बांबूने व दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. शंकर आकाराम कांबळे (वय ५५ रा. माळापुडे, ता. शाहुवाडी) असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना गौरी-गणपती विसर्जनाच्या दिनी पहाटे शिवाजी उद्यमनगर परिसरात कोटीतीर्थ तलावाजवळ घडली.

मुलीकडे आले आणि…

शंकर कांबळे हे आठवड्याभरापूर्वी कोल्हापुरात राहणाºया मुलीकडे आले होते. सोमवारी पहाटे ते कोटीतीर्थ परिसरात फिरत होते. त्यावेळी शुभम शेंडगे व रोहित सूर्यगंध या संशयितांनी त्यांच्याकडे तंबाखू मागितली. मात्र कांबळे यांनी खिशात तंबाखू असतानाही तंबाखू नसल्याचे सांगितले. त्यामुळे तंबाखूची तलफ लागलेल्या दोघांनी कांबळे यांची अंगझडती घेतली त्यांच्या खिशात तंबाखू आढळली. खोटे बोलल्याच्या राग अनावर झाल्याने त्या दोघांनी त्यांना बेदम मारहाण केली. रागाच्या भरात त्यांनी शेजारील दगड व लाकडी बांबू डोक्यात घातला. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाले. ते पाहून त्या दोघांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात अतिरक्तस्राव झाल्यामुळे कांबळे यांचा मृत्यू झाला.

गौरी-गणपती विसर्जनादिनी खून झाल्याने खळबळ

घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी नागरिक घराबाहेर पडत असतानाच रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह रस्त्याकडेला आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.  सदर माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो. नि. संजय गोर्ले, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व आरोपींना अटक करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांच्या फुटेजच्या आधारे संशयित शुभम अशोक शेंडगे (वय २८ रा. यादवनगर) याला ताब्यात घेतले, तर रोहित अजय सूर्यगंध (२७ रा. यादवनगर) चा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.