क्राईम न्यूजमहाराष्ट्र

A gang that smuggled trailers with goods worth lakhs of rupees | लाखो रुपयांच्या मालासह ट्रेलर पळवणारी टोळी जेरबंद

गुन्हे शाखा ३ च्या पोलिसांचे कौतुक

भार्इंदर : लाखो रुपयांच्या लोखंडी सळईचा माल घेऊ न जाणा-या चालकाला जीवे मारण्याची धमकी देत ट्रेलर पळवणा-या टोळीला अटक करण्यात आली आहे. या कौतुकास्पद कारवाईमुळे मिरा-भार्इंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी गुन्हे शाखा ३ च्या पथकातील पोलिसांचे कौतुक केले.

वज्रेश्वरी ते शिरसाड बाजूकडे जाणाºया रोडवर पारोळ नाकापासून अंदाजे ५०० मीटर शिरसाड बाजूकडे, ता. वसई येथे राजकुमार रामआधार सिंग हे त्यांच्या ताब्यातील ट्रेलर क्रमांक एम.एच .४८ ए . वाय .८७२४ या ट्रेलरमध्ये १७ लाख २० हजारांचे २७ टन लोखंडी सळई व ३७० किलो एम . एस . बेंडीग लोखंडी वायर असे भरुन जात असतांना पाच अनोळखी इसमांनी त्यांच्या ताब्यातील चार चाकी कारने ट्रेलरला अडवून ट्रेलरमध्ये चढून त्यापैकी एका इसमाने गावठी कट्टा दाखवुन फिर्यादीचा जबरदस्तीने मोबाईल काढून धक्काबुक्की व मारहाण करुन फिर्यादीस ड्रायव्हरच्या मागील सिटवर झोपवुन तोंडवर कापड टाकुन ट्रेलर चालवुन घेवून त्यांना वाटेत शिरसाड नाका ते विरार फाटा दरम्यान त्यांच्याकडील चारचाकी कारमध्ये जबरदस्तीने घालून डोळ्यावर पट्टी बांधली व त्याच्या ताब्यातील मालाने भरलेला ट्रेलर असा ४२ लाख २१ हजारांचा मुद्देमाल पळवला. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नंबर १२१/२०२२ भा.द.वि.सं. कलम ३ ९ ५ भारतीय इत्यार कायदा कलम ३ , २५ प्रमाणे अज्ञात आरोपीत विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होत.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त ( गुन्हे ) व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी दिलेल्या सुचना व मार्गदशर्नाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष ३ विरारच्या पोलीस पथकाने वेगवेगळे पथक तयार करुन गुन्हयातील आरोपीत यांची तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने माहिती प्राप्त करुन गुन्हा घडल्याच्या ३६ तासांच्या आत सापळा लाूवन आरोपी नौशाद अहमद मुस्ताक अहमद (वय २४ वर्षे), मोहमद समीर मोहम्मद जमील कुरेशी (वय २१ वर्षे), मेहताब आलम नसरत अली (वय २ ९ वर्षे) मोहम्मद दानिश मोहमंद वासिफ खान (वय २०) यांना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून दोन अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ९ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन सदर आरोपीतांना अटक करण्यात आली होती.

सदर कारवाई गुन्हे शाखा कक्ष ३ चे पोनि प्रमोद बडाख , पोउपनि शिवाजी खाडे , उमेश भागवत , पो.हवा . मुकेश तटकरे , शंकर शिंदे, सागर बारवकर , अशोक पाटील , मनोज चव्हाण , सचिन घेरे , पो.ना. मनोज सकपाळ , संग्राम गायकवाड , पो.अं. अश्विन पाटील , सुमित जाधव तसेच स.फौ. संतोष चव्हाण नेमणूक सायबर सेल , म.सु.ब. किशोर राठोड यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये सप्टेंबर महिन्यातील गुन्हयाची उत्कृष्ट उकल क्रमांक ३ म्हणुन प्रशस्तीपत्र व बक्षिस देवून मा . पोलीस आयुक्त श्री सदानंद दाते यांनी सत्कार कला आहे .

⇓⇓⇓ ही बातमीही वाचा… ⇓⇓⇓

महिलेचा खून करून मृतदेह फेकला कळंब खाडीत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.