45 mobiles seized from Uttar Pradesh, Karnataka, Madhya Pradesh | उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशातून जप्त केले ४५ मोबाईल
Mumbai Railway Police | रेल्वे प्रवासात चोरीला गेलेल्या मोबाईलची परराज्यात विक्री

मुंबई – रेल्वे प्रवासादरम्यान चोरीला गेलेले ६ लाख १६ हजार ३४ रुपयांचे ४५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सदर कारवाया मुंबई लोाहमार्ग पोलीस दलाच्या ( Mumbai Railway Police) विशेष पथकांनी उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश राज्यात केली. सर्वाधिक मोबाईल उत्तर प्रदेशातून जप्त करण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
रेल्वे प्रवासादरम्यान दररोज लाखोंच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. ऐन गर्दीच्या वेळी अर्थात सकाळी व सायंकाळी या गर्दीचा फायदा चोरटे घेतात. प्रवासादरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये चोरांनी नागरिकांचे मोबाईल पळवले. या प्रकरणी कुर्ला, दादर, वडाळा, मुंबई सेंट्रल, बोरिवली, पनवेल लोहमार्ग पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलिसांची पाच विशेष पथक नेमण्यात आली. या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधोर तपास करून चोरीला गेलेले ४५ मोबाईलचा डाटा प्राप्त केला. त्यानुसार मोबाईल जप्त करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली. तपासादरम्यान उत्तर प्रदेशातून १७ मोबाईल, मध्य प्रदेशातून १४ व कर्नाटकातून १४ असे एकूण ४५ मोबईल जप्त करण्यात आले.
या विशेष पथकाने केली कारवाई…

चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी ५ विशेष पथके नेमण्यात आली होती. या पथकापैकी उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा कनौज येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद देशमुख, हवालदार विवेकानंद पाटील, पोलीस नाईक गणेश कुमकर, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण यांना पोलीस नाईक अजित माने यांनी तांत्रिक मदत केली. तसेच उत्तर प्रदेशातील प्रतापनगर जिल्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सोन्ना, हवालदार गंगाधर दौंड, पोलीस नाईक विकास रासकर, पोलीस अंमलदार दत्ता वाघमारे या पथकाला पोलीस नाईक महेश काळे यांनी तांत्रिक मदत केली.
मध्य प्रदेश राज्यात गेलेले पोलीस पथक

मध्य प्रदेश राज्यातील जिल्हा इंदोर येथे पोलीस उपनिरीक्षक सचिन देसाई, हवालदार मनोज भ्गात, हवालदार विजयसिंग गिरासे, पोलीस नाईक प्रशांत साळुंखे गेले होते. या पथकाला हवालदार प्रवीण घार्गे यांनी तपासात तांत्रिक मदत केली.
त्याच प्रकारे मध्य प्रदेशातील सेवा, सतना, सिंधी, कटनी येथे पोलीस उपनिरीक्षक तानाजी सरकाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद जहांगिरदार, हवालदार संतोष चव्हाण, पोलीस अंमलदार धायगुडे गेले होते.
कर्नाटक राज्यात गेलेले पोलीस पथक
पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर, पोलीस नाईक अमित बडेकर, पोलीस नाईक अनिलकुमार खाडे, पोलीस नाईक सतीश धायगुडे, पोलीस अंमलदार अक्षय चव्हाण हे कर्नाटक राज्यातील बिदर येथे तपासासाठी गेले असता त्यांनाा पोलीस नाईक बडेकर यांनी तांत्रिक माहितीद्वारे मदत केली.
लोहमार्ग पोलीस आयुक्तांचे प्रवाशांना आवाहन

प्रवासादरम्यान सेवेसाठी लोहमार्ग पोलीस प्रत्येक स्थानकात २४ तास कर्तव्याला तैनात असतात. मात्र धावत्या रेल्वेत नागरिकांनी सतर्क राहिल्यास चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसू शकेल. त्यामुळे रेल्वे प्रवासात सुजान नागरिक या नात्याने कायम सर्तक राहिले पाहिजे, असे आवाहन मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी नागरिकांना केले आहे.