ब्रेकिंग

डीवायएसपीने केला दारु अड्डा उध्वस्त, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

घाटंजी : पारवा पोलीस स्टेशन हद्दीत व सावळी (सदोबा) दुरक्षेत्रात येणाऱ्या शिवर येथिल अवैध गावठी दारू अड्डा डीवायएसपी व पारवा पोलिसांनी धाड टाकुन उध्वस्त केला. अड्डा चालक चंद्रकांत गणेश गडदे, वय ५० वर्ष याला ताब्यात घेतले आहे. तसेच लाखोचा मुद्धेमाल जप्त केला आहे.

चंद्रकांत गणेश गडदे
यांचे शेत सर्वे नंबर १४८/१ मध्ये
अवैध गावठी दारू गाळप करून विक्री होत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. त्या अनुषंगाने पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे पथक व पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत अवैध गावठी दारू गाळप करून विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहे.

मागील कित्येक दिवसांपासून शिवर परिसरात अवैध गावठी दारू गाळप करून विक्री करीत असल्याची टीप उपविभागीय पोलिस अधिकारी व पारवा ठाणेदार यांना मिळाली त्यावरून त्यांनी संयुक्त पथक तयार करून १० ऑक्टोबर ला सापळा रचून अवैध गावठी दारू गाळप करीत असलेल्या चंद्रकांत गडदे यांच्या शेतात धाड टाकली असता मोहा मास सडवा, तयार झालेली दारू, प्लास्टिक ड्रम, असे यांची अंदाजे किंमत२२९८० रुपये, तयार झालेली दारू ५० लिटर, टिनाचे शेड प्लॅस्टिक बॉटल यांची किंमत अंदाजे ७८००० हजार असा एकूण १ लाख ९८० रुपयाचा मुद्देमाल मिळाला यात काही साहित्य व टिनाचे शेड जाग्यावर नष्ट करण्यात आले. सोबतच सावळी येथे सुरू असलेल्या मटका माहीत होताच तिथे सुध्दा धाड टाकून आरोपी कैलास नरशा खंदारे ६२८० रुपयाचे मुद्देमाल साहित्य जप्त करीत कारवाई करण्यात आली. ठाणेदार विनोद चव्हाण रुजू झाल्यापासून अवैध धंद्यांवर छापे टाकण्याचा सपाटा सुरू करून कारवाई करण्यात येत असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पारवा ठाणेदार विनोद चव्हाण, पोलीस अमलदार लखन राठोड, निर्मल राठोड, राहुल ऊइके, संदीप महाजन यांचे सह उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे रवी सिहे, धिरज राठोड, प्रशांत चौकड यांची संयुक्तिक कारवाई चालू आहे. या कारवाईत शिवरचे सरपंच दिगांबर पवार, पोलीस पाटील सावके यांचे सह ग्राम पंचायत सदस्य व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!