ब्रेकिंग

रिमोट कंट्रोलद्वारे १५ लाखांची वीज चोरी 

 

यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद व परिसरात महावितरणकडून राबविण्यात आलेल्या वीज चोरीविरूध्दच्या मोहिमेत १५ लाखाची वीज चोरी उघड करण्यात आली आहे. तडजोड शुल्कासहित वीज चोरीची रक्कम न भरणाऱ्या वीज चोरांविरूध्द विद्युत कायदा २००३ कलम १३५ अंतर्गत फौजदारी दाखल करण्यात येणार आहे. तसेच पुसद परिसरात वीज चोरीचा वाढलेल्या सुळक्याला आवर घालण्यासाठी वीज चोरी विरूध्द मोहिम अधिक तीव्र करण्याच्या निर्देश वरीष्ट कार्यालयाकडून देण्यात आलेले आहे.

पुसद उपविभागाअंतर्गत पुसद शहर लक्षमीनगर, कासोळा,मांजर जवळा,जांम बाजार,बोरी खु. सावरगाव बंगला या परिसरात महावितरणकडून धाडसत्र राबवत वीज चोरीची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत अनेक ठिकाणी वीज चोरीचे अफलातून प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.यामध्ये मीटर मध्ये रिमोट कंट्रोल किट बसवणे,मीटरला मागील बाजून छीद्र पाडून रेजिस्टंट टाकणे, मीटरची गती कमी करण्यासाठी मॅग्नेटचा वापर करणे,तसेच मीटर बायपास करणे आदी प्रकार केल्याच उघडकीस आले आहे. कार्यकारी अभियंता संजय आडे यांच्या मार्गदर्शनात व उपकार्यकारी अभियंता डी.एच.राजपूत व त्यांच्या उपविभागीय टिमच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकून ५४ ठिकाणी  ६६२७८ युनिट आणि १५ लाख ३२ हजार ९८० रूपयाच्या वीज चोरीप्रकरणी फौजदारी दाखल करण्याची प्रक्रीया  महावितरणकडून राबविण्यात येत आहे. वीज चोरी प्रकरणी एक संधी म्हणून ग्राहकांना तडजोड शुल्क भरून फौजदारी दाखल करण्यापासून  सुटका मिळविण्याची संधी देण्यात येते. परंतू दुसऱ्या वीज चोरी प्रकरणात ग्राहकांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येतो.वीज चोरीच्या या प्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षा पर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.वीज मीटर मध्ये फेरफार करण्यासाठी प्रवृत्त व सहकार्य करणाऱ्या विरुद्ध विद्युत कायद्यातील कलम १५० नुसार गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!